boy dies due to heat stroke in sambhaji nagar : राज्यात बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने उच्चांक गाठला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा हा ३९ डिग्री अंश सेल्सियसवर पोहोचला आहे. या वाढत्या उन्हामुळे राज्यातील पहिला बळी संभाजी नगर येथे गेला आहे. पैठण तालुक्यातील बिडकीनमध्ये उष्माघतामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे घरा बाहेर पडतांना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राधेश्याम कुलकर्णी (वय ३०) असे उष्माघातामुळे बळी गेलेल्या तरुणाचे नाव आहे. वाढलेल्या उन्हामुळे त्याला स्ट्रोक आल्याने गणेशचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. राधेश्याम हा पैठण येथील बिडकीन येथे एका कंपनीत काम करत असून तो जैनपूर मार्गाने बिडकीनकडे घरी येत असतांना त्याला अचानक चक्कर आली. यावेळी त्यांचा तोंडातून फेस आल्याने त्याला तातडीने बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याकहा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वाढत्या उन्हामुळे त्याला चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगितले.
राज्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. सध्या राज्यावर अवकाळी पावसाचे ढग असले तरी उद्यापासून राज्यात हवमान कोरडे राहणार असून तापमानात वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने धाराशिव, लातूर, सोलापूर, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ अकोला जिल्ह्यात पुढचे ३ दिवस उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
घराबाहेर जास्त वेळ काम करणे किंवा उन्हाळ्यात इतर मजुरीची कामे करणे.
कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे, काचेच्या कारखान्यात काम करणे.
उच्च तापमान खोलीत काम
उष्माघात हा थेट उष्णतेच्या सतत संपर्कामुळे किंवा वाढलेल्या तापमानाच्या परिस्थितीमुळे होतो, जसे की घट्ट कपडे घालणे.
थकवा, ताप, कोरडी त्वचा
भूक न लागणे, चक्कर येणे, नैराश्य, डोकेदुखी
रक्तदाब वाढणे, मानसिक अस्वस्थता आणि अस्वस्थता, बेशुद्धी इ.
रुग्णाला हवेशीर खोलीत ठेवावे, पंखे, कुलर खोलीत ठेवावे, वातानुकूलित खोली ठेवावी.
रुग्णाचे तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत
रुग्णाला थंड पाण्याने आंघोळ घाला
रुग्णाच्या कपाळावर थंड पाणी ठेवावे, बर्फाचा पॅक लावावा
आवश्यकतेनुसार इंट्राव्हेनस सलाईन द्या.
पुरेसे पाणी प्या. प्रवासात पाणी सोबत ठेवा,
हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा.
उन्हात जाताना टोपी / हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवा.
ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.
शक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा. कष्टाची कामे उन्हात करु नका.
पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका.
गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका...
मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिक्स टाळा,
खूप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका