Aurangabad crime : माजी उपसभापतीच्या लॉजवर वेश्या व्यवसाय; पोलीस कारवाईत समोर आली धक्कादायक माहिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aurangabad crime : माजी उपसभापतीच्या लॉजवर वेश्या व्यवसाय; पोलीस कारवाईत समोर आली धक्कादायक माहिती

Aurangabad crime : माजी उपसभापतीच्या लॉजवर वेश्या व्यवसाय; पोलीस कारवाईत समोर आली धक्कादायक माहिती

Sep 13, 2023 01:47 PM IST

Aurangabad sex Crime: औरंगाबाद येथील वैजापूर येथे माजी उपसभापतीच्या लॉजवर सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला असून हॉटेल मेनेजर आणि लॉज मालक यात गुंतले असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

 Aurangabad sex Crime
Aurangabad sex Crime

औरंगाबाद : औरंगाबाद येथील वैजापूर येथील माजी उपसभापतीच्या एका लॉजवर सुरू असलेला वेश्या व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत पीडित महिलांची सुटका केली. पोलिसांनी छापा टाकताच हॉटेल मालक आणि मॅनेजर त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी कुंटनखाना चालवत होते. पोलिसांनी या प्रकरणी माजी उपसभापतीसह हॉटेल मॅनेजरला अटक केली आहे.

Pune high alert : पुण्यात हाय अलर्ट! सुरक्षा व्यवस्थेत अचानक मोठी वाढ, सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांना कडक इशारा

विष्णु भिमराव जेजुरकर (वय ७३, लॉज मालक, रा. महाराणा प्रताप चौक, वैजापुर) मच्छिंद्र विनायक जगदाळे वय ४३, मॅनेजर, रा.बेलगाव ता. वैजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावं आहे. तर आरोपी विष्णु जेजुरकर हे माजी उपसभापती आहे.

Ajit Pawar : अजित पवार गटाचं ट्विटर हॅण्डल सस्पेंड; 'हे' आहे कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर येथील महाराणा चौकात जेजूरकर यांचे लक्ष्मी लॉज आहे. या ठिकाणी वेश्याव्यवसाय करून असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक महक स्वामी यांना मिळाली. त्यांनी त्यांच्या पथकासह बनावट ग्राहक पाठवून या लॉजवर धाड टाकली. यावेळी लॉजच्या खोली नं २०१ मध्ये हा सर्व गैर प्रकार सुरू असल्याचे पोलिसांना आढळले.

पोलिसांनी पिडीत महिलेची सुटका करत लॉज मालक विष्णु भिमराव जेजुरकर आणि मॅनेजर मच्छिंद्र विनायक जगदाळे यांना अटक केली. त्यांच्यावर अनैतिक देह व्यापार अधिनियम अंतर्गत पोस्टे वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटणस्थळावरून १२ हजार २९० रूपये रोख, मोबाईल फोन, निरोध पाकिट असा ३६ हजार ४९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर