Maharashtra News: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून अनेक बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे नाराज असलेले किमान डझनभर आमदार अधिवेशन सोडून आपापल्या मतदारसंघात परतले आहेत. आमदारांच्या या भूमिकेबद्दल आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे. अधिवेशन हे मतदारसंघातील व राज्यातील महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासाठी असते. असं असताना वैयक्तिक नाराजीपोटी ते सोडून परतणे हे योग्य आहे का? मतदारांचं काय? असा सार्वत्रिक सूर उमटत आहे.
छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याने असे बक्षीस मिळाले, असे त्यांनी म्हटले. यानंतर अजित पवार,सुनील तटकरे यांना भेटण्याची गरज वाटत नसल्याचे सांगत अधिवेशन अर्ध्यावर सोडून त्यांनी थेट नाशिकचा रस्ता धरला. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी नाशिक आणि येवल्यात निदर्शने केली.
छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळात स्थान मिळालेले भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, शिंदे गटाचे दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दल सत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह १२ आमदार सभागृहात आले नाही. दरम्यान, नाराज असलेले सुधीर मुनगंटीवार, विजय शिवतारे, सदाभाऊ खोत यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आणि भाजप फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असे माध्यमांशी बोलताना म्हटले. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, प्रदीर्घ चर्चा झाली नाही. आज नुसते बोलणे झाले.
शिवसेनेशी बंडखोरी करून शिंदे गटाला जाऊन मिळालेले विजय शिवतारे यांनाही मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला. यावर बोलताना शिवतारे म्हणाले की, मंत्रिपद मिळाल्याचे दु:ख नाही. पण आम्हाला मिळालेली वागणून वाईट वाटते. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर तिन्ही नेते साधे भेटायलाही तयार नाहीत. आता अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिले तरी घेणार नाही. मला मंत्रिपदाची गरज नाही. माझ्या मतदारसंघातील प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर मांडणे आणि ते मार्गी लावणे मला अधिक महत्त्वाचे वाटते.
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले सदाभाऊ खोत म्हणाले की, आम्ही तिन्ही पक्षांचे शेत नांगरून दिले. मात्र, आता आमचे शेत नांगरायची वेळ आली तर, बैलांसकट गडीही घेऊन गेले. याशिवाय, नागपूर पूर्वेच आमदार कृष्णा खोपडे यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे भाजपच्या संघटनात्मक पदाचा सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.
संबंधित बातम्या