मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण कमालीचं तापलं आहे. यावरून राजकारणही ढवळून निघालं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी छत्रपत्री संभाजीनगर येथे भव्य शांतता रॅलीमध्ये सरकारला २०जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. जरांगे व भुजबळ यांच्याकडून टोकाची विधाने केली जात असताना आज बारामतीत आयोजित जनसन्मान मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ यांनी सर्वात मोठा गौप्यस्फोट करत शरद पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यात खळबळ माजली आहे.
आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, तुमचा राग अजित पवार आणि छगन भुजबळांवर असेल, पण ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलंय, असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना केला. बारामतीमध्ये माळी, मराठा, धनगर समाजाने तुम्हाला मतं दिली. पण सर्वांच्या बाबतीत तुमची भूमिका काय हे का सांगत नाही.
विरोधकांना पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणिमहाराष्ट्र पेटवण्याचा उद्योग करायचा, असा गंभीर आरोप छगन भुजबळांनी शरद पवारांवर केला. ज्यावेळी निवडणूक येईल त्यावेळी तुमची भूमिका मांडा, आम्ही आमची मांडू. पण राज्यातील सामाजिक प्रश्न पेटत असताना तुम्ही मुद्दामहून शांत का बसताय असंही छगन भुजबळ म्हणाले.
सामाजिक प्रश्न चर्चेने सुटत असताना मुद्दाम बहिष्कार टाकायचा,मुद्दाम तिथे यायचं नाही हे योग्य नाही. निवडणूक असेल तेव्हा तुमचे झेंडे हाती घ्या,तुमचे मुद्दे मांडा. पण, सामजिक प्रश्नी सगळ्यांनी एकत्र यायला हवं.”, असंही म्हणाले आहेत.
भुजबळ म्हणाले की, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. त्यावेळी सर्व विरोधकांना बैठकीला येण्याची विनंती केली होती. ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारही बैठकीला येणे अपेक्षित होते. मात्र बारामतीतून कुणाचा तरी फोन आला आणि सर्व विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत, असा आरोपछगन भुजबळ यांनी केला.
संबंधित बातम्या