फुलं उधळण्यासाठी २०० जेसीबी.. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, पण ते गरीब, भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  फुलं उधळण्यासाठी २०० जेसीबी.. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, पण ते गरीब, भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा

फुलं उधळण्यासाठी २०० जेसीबी.. हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, पण ते गरीब, भुजबळांचा जरांगेंवर पुन्हा निशाणा

Jan 06, 2024 08:34 PM IST

Chhagan Bhujbal On Maratha Reservation : काही झालं तरी ओबीसीमधून मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही,असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं.

Chhagan Bhujbal s
Chhagan Bhujbal s

ती गरीब लेकरं आहेत, त्यांच्या मागण्याही खूप आहेत. लेकरं-बाळं गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण पाहिजे.  फुलं उधळण्यासाठी प्रत्येक सभेत ते २०० जेसीबी आणतात, हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव होतोय पण तेगरीब आहेत. मुंबईत उपोषण कुठं करायचं यासाठी जागा बघायला यांची लेकरं २०० गाड्या घेऊन गेले, असा निशाणा मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांवर साधला आहे.

ओबीसी नेत्यांची एल्गार सभा आज पंढरपुरात आयोजित करण्यात आली होती. या सभेत मार्गदर्शन करताना भुजबळांनी पुन्हा एकदा जरांगेंवर तोफ डागली. भुजबळ म्हणाले कीमराठा समाजाचे जे गरीब कार्यकर्ते आहेत, सभेला आले अपघातात गेले. माझ्या मतदारसंघातीलही काही जण तिथे गेले. जेसीबीच्या अपघातात एक जण मृत्यूमुखी पडला.जे मृत्यूमुखी पडले त्यांचं काय?त्यांची त्यांना आठवण नाही, असा टोला छगन भुजबळांनी लगावला.

मुंबईला आंदोलनासाठी जाणार आहेत. आता उपोषणासाठी मैदान बघायला त्यांची गरीब लेकरं-बाळं २०० गाड्या घेऊन मुंबईला गेले. हे सगळे गरीब आहेत आणि माझ्यासमोर बसेलेले भटके-विमुक्त, माळी, कोळी हे काय श्रीमंत आहेत? मुळात आरक्षण हे गरिबी हटाव मोहीम नाही.असं छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षणासाठी मी नेहमी पाठिंबा दिला आहे. त्यांना आरक्षण वेगळं द्या. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जी झुंडशाही सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे आमचा आरक्षणाला विरोध नाही. तुम्हाला आरक्षण पाहिजे तर घ्या. पण ते ओबीसीतून न घेता स्वतंत्र घ्या. तुम्हाला १०, १२, १५ टक्के जितकं पाहिजे तितकं घ्या मात्र आमच्यातून न घेता स्वतंत्र आरक्षण घ्या. पण यांचं म्हणणं आहे की, ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. काही झालं तर ओबीसीमधून मराठा सामाजाला आरक्षण मिळणार नाही म्हणजे नाही, असं छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितलं.

Whats_app_banner