ईडीपासून सुटका करून घेण्यासाठीच अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही भाजप सोबत गेलो; छगन भुजबळ यांची जाहीर कबुली
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ईडीपासून सुटका करून घेण्यासाठीच अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही भाजप सोबत गेलो; छगन भुजबळ यांची जाहीर कबुली

ईडीपासून सुटका करून घेण्यासाठीच अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही भाजप सोबत गेलो; छगन भुजबळ यांची जाहीर कबुली

Nov 08, 2024 11:02 AM IST

Chagan Bhubal on ED : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून या रणधुमाळीत छगन भुजबळ यांनी ईडीवर मोठ वक्तव्य केलं आहे.

ईडीपासून वाचण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही भाजप बरोबर! छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ
ईडीपासून वाचण्यासाठी अजित पवारांच्या नेतृत्वात आम्ही भाजप बरोबर! छगन भुजबळ यांच्या दाव्याने खळबळ

Chagan Bhubal on ED : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. प्रचाराचा ज्वर शिगेला पोहोचला आहे. मतदारराजाला खूश करण्यासाठी अनेक आश्वासने दिली जात आहे. या रणधुमाळी राष्ट्रवादी अजित पावर गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ईडीच्या भीतीने आम्ही सर्वांनी बंडखोरी करून भाजपसोबत महायुतीत सहभागी झालो. ईडीतून सुटका म्हणजे माझा पुनर्जन्मच झाला, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकात त्यांनी या बाबत खुलासा केला आहे.   या पुस्तकातील ‘हमारे साथ ईडी है’ या शीर्षकाच्या प्रकरणात राज्यातील राजकारण व पक्ष फोडाफोडीच्या राजकारणामागील घडामोडी मांडण्यात आल्या आहेत.

महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडली. २ जुलै २०२३ या दिवशी अजित पवार यांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह महायुतीत सहभागी झाले होते. यावेळी ईडीच्या भीतीमुळे या सर्वांनी महायुतीत सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. असा आरोप होत होता. आता छगन भुजबळ यांनी याची जाहिर कबुली दिल्याने यावर शिकामोर्तब झालं आहे.

भुजबळ म्हणाले, ईडीमुळे मला सर्वाधिक त्रास झाला आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षे मी तुरुंगात होतो. यानंतर मला जामीन मिळाला. मात्र, पुन्हा मला ईडीची नोटीस आली. या वयात मला किती वेळा चौकशीला सामोरे जायचे हा प्रश्न माझ्यासमोर होता. अनिल देशमुख हे देखील १०० कोटींच्या आरोपामुळे तुरुंगात होते. तुरुंगात असताना भाजपमध्ये सहभागी व्हा तरच सुटका होईल’, असा निरोप त्यांना देण्यात आला होता. हाच निरोप मला देखील आला होता. तुरुंगातील त्या आठवणींमुळे माझी आजही झोप उडते.

भुजबळ यांनी म्हटलं आहे की, मला, देशमुख व मलिकांना ईडीने अटक केल्यावर भाजप सोबत हात मिळवी केल्याशिवाय यातून सुटका होणार नाही अशी आमच्या सर्वांची भावना झाली होती. याबाबत आम्ही आमची व्यथा शरद पवार यांच्यापुढे मंडळी होती. मात्र, भाजप सोबत जाण्यास ते अनुकूल नव्हते. त्यामुळे आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे आम्हा सर्वांची ईडीच्या जाचापासून सुटका झाल्याचं देखील भुजबल यांनी म्हटलं आहे.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर