मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  देहूत तुकारामांच्या भेटीला पंतप्रधान आले आणि एकनाथला सोबत घेऊन गेले…
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal (PTI)
22 June 2022, 12:58 ISTHT Marathi Desk
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
22 June 2022, 12:58 IST
  • देहू येथे तुकाराम महाराजांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि एकनाथाला सोबत घेऊन गेले, अशी मार्मिक प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

देहू येथे तुकाराम महाराजांच्या भेटीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले आणि एकनाथ (शिदे) यांना सोबत घेऊन गेले, अशी मार्मिक प्रतिक्रिया अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. सध्याच्या ताज्या राजकीय घडामोडींवर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. Chhagan Bhujbal on Eknath Shinde)

ट्रेंडिंग न्यूज

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले ३५ पेक्षा जास्त आमदारांचा मुक्काम गुजरातेतील सूरतहून आज भल्या पहाटे आसामची राजधानी गुवाहाटी येथे हलवण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरू असल्याच्या संजय राऊत यांच्या ट्विटवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. राजकीय पक्ष हे निवडणुकीसाठी नेहमीच तयार असतात, असं भुजबळ म्हणाले.