Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?

Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?

Dec 23, 2024 01:48 PM IST

Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : मंत्रिपद मिळाले नसल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ सध्या नाराज आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून लवकरच ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! दोघांच्या बैठकीत काय घडलं ?

Chhagan Bhujbal Meets Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या नाराजीनाट्य सुरू आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुले छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी आता त्यांची नाराजी उघडपणे बोलण्यास सुरवात केली आहे. या दरम्यान, आज सोमवारी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातून डावलल्याने नाराज झालेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली.

भुजबळांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तब्बल ४० मिनिटे त्यांची बैठक चालली असून यात नेमके काय झाले या बाबत भुजबळ यांनी सांगितलं आहे. दरम्यान, भुजबळ हे लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी समीर भुजबळ देखील त्यांच्या सोबत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत जो महाविजय झाला यात ओबीसी समाजाचे मोठे पाठबळ मिळाले असून त्याबद्दल आभार मानत त्यांनी ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. या बाबत मी काळजी घेणार असे म्हटल्याचे बैठकी नंतर छगन भुजबळ म्हणाले.

काय म्हणाले भुजबळ ?

छगन भुजबळ यांनी आज सकाळी १०.३० वाजता सागर बंगल्यावर सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेतली. या बैठकीबाबत भुजबळ म्हणाले, आमची राजकीय व सामाजिक विषयांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत आम्ही राज्यातील काही घडामोडीवर देखील चर्चा केली. या निवडणुकीत ओबीसींमुळे महायुतीला मोठे यश मिळाले असे मुख्यमंत्री म्हणाले. ओबीसी संघटनांच्या बैठका सुरू असून त्यांच्या नाराजीची कल्पना फडणवीस यांना असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. ओबीसींचे नुकसान होऊ नये अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. तर सरकारही ओबीसींचे नुकसान करणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. पुढील काही दिवसांनत पुन्हा भेटून मार्ग काढण्याचे आश्वास देखील फडणवीस यांनी दिले असल्याचे भुजबळांनी सांगितले.

अजित पवारांच्या 'त्या' विधानावर काय म्हणाले छगन भुजबळ?

अजित पवार यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केलं होतं. काहीना मी थांबण्यासाठी सांगितलं होतं असे पवार म्हणाले होते. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले, त्यांनी जे ठरवलं ते चांगलं आहे. त्यांनी तरुणांना संधी देण्याचे वक्तव्य केलं होतं. पण हे आता ठरवलं पाहिजे किती वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे? मी आधीच मला लोकसभेत पाठवा अशी मागणी केली होती. मात्र, मला थांबायला सांगितलं होतं. त्यावेळी माझी राज्यात गरज आहे असे ते म्हणाले. मात्र, आता मला राज्यसभेत जा म्हणत आहेत. त्यामुळं आता मी विधासभेचा राजीनामा द्यावा का ? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या