chhagan bhujbal : शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले छगन भुजबळ वेटिंगवर, अर्ध्या तास बसूनही भेट नाही!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  chhagan bhujbal : शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले छगन भुजबळ वेटिंगवर, अर्ध्या तास बसूनही भेट नाही!

chhagan bhujbal : शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले छगन भुजबळ वेटिंगवर, अर्ध्या तास बसूनही भेट नाही!

Updated Jul 15, 2024 12:06 PM IST

chhagan bhujbal sharad pawar meeting : राज्यात ओबीसी आणि मराठा वाद सुरू असताना आज सकाळी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

मोठी बातमी! ओबीसी मराठा वादादरम्यान, छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट
मोठी बातमी! ओबीसी मराठा वादादरम्यान, छगन भुजबळांनी घेतली शरद पवारांची भेट

chhagan bhujbal sharad pawar meeting : राज्यात सध्या ओबीसी आणि मराठा वाद पेटला आहे.  जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना छगन भुजबळ यांनी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज ते मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. मात्र, पवारांच्या भेटीसाठी ते एक तासापासून वाट पाहत असल्याचं समजतं.

बारामती येथे रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. भुजबळ या सभेत म्हणाले, राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जातात. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत असल्याचे भुजबळ म्हणाले होते. त्यांच्या या टीकेमुळे खळबळ उडाली होती. या टीकेनंतर आज ते सिल्व्हर ओक निवासस्थानी पोहोचले. मात्र, वेळ न घेताच भुजबळ सिल्वर ओकवर गेल्यामुळं त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आल्याची माहिती आहे. 

भेटीची पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती!

शरद पवार यांची प्रकृती फारशी ठीक नाही. त्यामुळं त्यांनी भेटीगाठी कमी केल्या आहेत. आज त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना भेटीसाठी बोलावलं होतं. मात्र, छगन भुजबळही तिथं पोहोचले. भुजबळ यांनी भेटीसाठी येणार असल्याची पूर्वकल्पना दिली नव्हती असं समजतं. त्यामुळं त्यांना वेटिंगवर राहावं लागल्याचं बोललं जातं. भुजबळ हे अर्ध्या तासापासून तिथं बसून आहेत. पवार साहेबांची भेट घेऊनच जाणार असा त्यांचा पवित्रा असल्याचं सूत्रांकडून समजतं.

आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांच्यावर साधला होता निशाणा

बारामती येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात छगन भुजबळ यांनी आरक्षणाच्या मुद्यावर शरद पवार यांच्यावर टीका केली होती. एक ज्येष्ठ नेते म्हणून हा प्रश्न सोडवला पाहिजे होता, असे भुजबळ म्हणाले होते. तुमचं वैर छगन भुजबळशी असो किंवा अजित पवारांशी असो ओबीसी समाजाने काय घोडं मारलं आहे? सध्या राज्यात सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला येणार होते. मात्र, त्यांना बारामतीतून फोन गेल्याने ते सर्वपक्षीय बैठकीला आले नाही, असेही भुजबळ म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या