Dombivli MIDC Blast : डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील एका केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. गुरुवारीदुपारी१ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली. अंबर केमिकल कंपनी,मेट्रो कंपनी जवळ,एम.आय.डी.सी. फेज- ०२, सोनारपाडा,डोंबिवली (पूर्व) या कंपनीत हा स्फोट झाल्यानंतर भीषण आह लागली.
या स्फोटाने ३ ते ४ किलोमीटर परिसरातील इमारतींचे नुकसान झाले असून अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या दुर्घटनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित केल्या जातील. (chemical companies in dombivli to shift)
उदय सामंत म्हणाले की, केमिकल कंपनीत लागलेलीआग आटोक्यात आली असून कंपन्यांमध्ये कोणी अडकलं आहे का, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ६ मृतदेह सापडले आहे. डोंबिवलीतील धोकादायक केमिकल कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील. आचारसंहिता संपल्यावर म्हणजे ४ जूननंतर डोंबिवलीतील कंपन्यांचे वर्गीकरण केले जाईल. तसेच धोकादायक कंपन्या शहराबाहेर शिफ्ट केल्या जातील.
सामंत म्हणाले की, हे मी आज स्फोट झाला म्हणून म्हणत नसून अनेक दिवसांपासून याचे काम सुरू आहे. कंपन्या शिफ्ट करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. मात्र हा प्रश्न आता सुटला आहे. वर्षभर यावर काम सुरू होते.जागा शोधली आहे, मात्र जागेचे वाटप अद्याप केलेले नाही. ४ जूननंतर जागेचे वाटप करण्यात येईल.
एमआयडीसीतील धोकादायक केमिकल कंपन्या हलवण्याची डोंबिवलीकरांची मागील अनेक दिवसांपासूनची मागणी आता ४ जूननंतर पूर्ण होणार आहे.
सामंत म्हणाले की, या केमिकल कंपन्यांमध्ये नियमबाह्य काही झालं आहे का? याची तपासणी करण्याच्या सूचना अग्निशमन दलाला दिल्या आहेत. तसंच या घटनेची सखोल चौकशीही केली जाणार असून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. जखमींवरील उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.
संबंधित बातम्या