मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News: मुंबईत मालवणीत राम नावमीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गटांत राडा; पोलिसांकडून लाठीचार्ज
 Mumbai Malad News:
Mumbai Malad News:

Mumbai News: मुंबईत मालवणीत राम नावमीच्या शोभायात्रेदरम्यान दोन गटांत राडा; पोलिसांकडून लाठीचार्ज

31 March 2023, 9:02 ISTNinad Vijayrao Deshmukh

Mumbai Malad News: देशभरात काल रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. मात्र, आदल्या रात्री संभाजी नगर येथे दोन गटात राडा झाला. ही घटना ताजी असतांना काल रात्री शोभा यात्रे दरम्यान, मुंबईतील मालवणी येथे मिरवणूकीत दोन गटात हाणामारी झाली.

मुंबई : छत्रपती संभाजी नगर येथील प्रकरणानंतर मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरात काल रात्री रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रेत दोन गटात राडा झाला. यामुळे मोठा गोंधळ उडला. मोठ्या प्रमाणात घोषणा बाजी दोन्ही कडून सुरू होती. दरम्यान, तणाव वाढल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत लाठीचार्ज केला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी तणावपूर्ण वातावरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतील दोषींवर करवाई करण्याची मागणी करत भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी रात्री मालवणी पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केले.

मुंबईत गुरुवारी रात्री राम नवमीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त मुंबईतील मालवणी येथे मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, मिरवणूक सुरू असतांना अचानक दोन गटात राडा झाला. एकमेकांविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. परिस्थिती चिघळत असतांना पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप करत लाठीचार्ज करत जमावाला पांगवले. पोलिसांमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली. या घटनेची दखल घेत पोलिसांनी शांतेतेचे आवाहन केले. यानंतर पुन्हा मिरवणूक सुरू झाली. दरम्यान या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत भाजप युवा मोर्चा आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मालवणी पोलिस ठण्यासमोर आंदोलन केले.

दरम्यान, तणाव निर्माण झालेल्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. रात्रभर पोलिसांनी याठिकाणी खडा पहारा आणि पेट्रोलिंग सुरू ठेवले होते. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता ठेवावी, असं आहवानही पोलिसांनी केलं आहे. मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याप्रकरणी पोलिसांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.

विभाग