मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai: ना पाणी, ना वॉशरुम, काहीच सुविधा नाही; मुंबई विमानतळावर प्रवासी अडकले, राधिका आपटे म्हणते…

Mumbai: ना पाणी, ना वॉशरुम, काहीच सुविधा नाही; मुंबई विमानतळावर प्रवासी अडकले, राधिका आपटे म्हणते…

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 13, 2024 11:08 PM IST

Mumbai Airport Aerobridge News: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एरोब्रिजमध्ये प्रवासी अडकून बसल्याची माहिती समोर आली.

 Chhatrapati Shivaji Maharaj International Airport
Chhatrapati Shivaji Maharaj International Airport

Radhika Apte Instagram post: मुंबईहून भुवनेश्वरला जाणाऱ्या इंडिगो विमानातील प्रवासी शनिवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एरोब्रिजवर तासभर अडकून पडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे संपूर्ण विमानतळावर एकच गोंधळ उडाला. दरम्यान, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी प्रवाशांसह एरोब्रिजमध्ये अडकून पडलेली अभिनेत्री राधिका आपटेने तिचा अनुभव सोशल मीडियाद्वारे शेअर केला.

राधिका आपटेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली. नुकत्याच शेअर केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये राधिकाने तिला मुंबई विमानतळावर आलेल्या अनुभवाविषयी सांगितले आहे. राधिका आपटे आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “अखेर मला ही गोष्ट पोस्ट करावी लागत आहे. आज सकाळी साडेआठ वाजता माझी फ्लाइट होती. आता बरोबर १०.५० झाले आहेत. तरीही अद्याप फ्लाइटचा काहीच पत्ता नाही. फ्लाइट लवकरच येईल असे सांगून आम्हा सगळ्या प्रवाशांना एरोब्रिजमध्ये बसवले आणि बाहेरून लॉक करण्यात आले आहे.

पुढे राधिका आपटे म्हणाली की, "याठिकाणी काहीजण त्यांच्या लहान मुलांबरोबर प्रवास करत आहेत. वृद्ध प्रवासी, लहान मुलं सगळ्यांनाच गेल्या तासाभरापासून कोंडून ठेवलं आहे. सुरक्षारक्षक दरवाजे उघडण्यास तयार नाहीत. येथील कर्मचाऱ्यांना कशाचीही पूर्ण माहिती नाही. त्यांचे क्रू मेंबर्स आलेले नाहीत. शिफ्टमध्ये बदल झाल्याने ते अजूनही नवीन क्रूची वाट पाहत आहेत. आता नवीन क्रू केव्हा येईल? याची कोणालाही कल्पना नाही आणि आम्हाला असं किती काळ बंद करून ठेवणार याबाबतही काहीच माहिती नाही."

"बाहरेच्या एका मूर्ख कर्मचारी महिलेशी बोलण्यासाठी मी गेले. पण ती फक्त तुम्हाला काहीच अडचण येणार नाही एवढंच सांगत होती. १२ वाजेपर्यंत ना पाणी ना वॉशरुम काहीच सुविधा नाही! या सुंदर प्रवासासाठी खूप धन्यवाद!”

WhatsApp channel

विभाग