Mahayuti Shivaji Park Sabha: मुंबईतील सहा मतदार संघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान होत आहे. येथील प्रचाराची सांगता ही उद्या शनिवारी होत आहे. त्या आधी आज मुंबईत महायुती आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांची सांभा होणार आहे. महायुतीची सभा शिवाजी पार्क मैदानावर तर इंडिया आघाडीची सभा ही बीकेसी मैदानावर होता आहे. शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभेत पीएम मोदी आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. यानंतर मोदी यांचा रोड शो देखील होणार आहे. यामुळे येथे होणारी गर्दी पाहता दादर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. मुंबईवाहतूक पोलिसांनी याची माहिती ट्विट करून दिली आहे.
मुंबई पोलिसांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या महायुतीच्या सभेमुळे दादर येथील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी १० ते रात्री १२ दरम्यान या भागात करण्यात आलेल्या वाहतूक बदलांची नोंद नागरिकांनी घ्यावी, असे ट्विट मध्ये म्हटले आहे.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी यस बँक जंक्शन ते श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन (पर्यायी मार्ग दांडेकर चौक येथे डावे वळण घेवून पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड)
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी: श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते यस बँक जंक्शन. (पर्यायी मार्ग श्री. सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेवून एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग)
बसेस पार्क करण्याकरीता संपुर्ण सेनापती बापट मार्ग, माहिम रेल्वे स्थानक ते टिळक ब्रीज पर्यंत, रेती बंदर, नाथालाल पारेख मार्ग, लेडी जहांगिर रोड, रुईया जंक्शन ते पाच गार्डन ते सेंड जोसेफ स्कूल, सेंड जोसेफ स्कूल ते खालसा कॉलेज, आर. ए. के. ४ रोड, अरोरा जंक्शन ते लिज्जत पापड जंक्शन ते एडस् रुग्णालय पर्यंत, लोढा सार्वनिक वाहनतळ, सेनापती बापट मार्ग, कामगार मैदान, कोहिनुर सार्वजनिक वाहनतळ, इंडिया बुल फायनांन्स सेंटर सार्वजनिक वाहनतळ, रहेजा सार्वजनिक वाहनतळ, ग्लास्को जंक्शन ते दिपक टॉकी जंक्शन पर्यंत, सुदाम काळू अहिरे मार्ग, नारायण हर्डीकर मार्ग हार्डीकर जंक्शन ते सेक्रेट हार्ड हायुस्कूल पर्यंत, सासमिरा रोड.
स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम. संपुर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, संपुर्ण एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. 4 ते शितलादेवी रोड, एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल एन. सी, केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, टी. एच. कटारीया मार्ग गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, टिळक रोड:- कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, खान अब्दुल गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपुर चौक ते बिंदु माधव ठाकरे चौक, थडानी मार्ग:- पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक, डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पीटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.