Chandrayaan-3 : चांद्रयानच्या यशात मराठवाड्याचा वाटा; लँडरच्या थर्मल शिल्डची या शहरांमध्ये निर्मिती
Chandrayaan-3 Updates : भारताचं चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुरक्षितरित्या उतरलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह देशभरात जोरदार जल्लोष करण्यात येत आहे.
chandrayaan 3 current status live today : भारतीय अंतराळ संस्था असलेल्या इस्त्रोकडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ चं यशस्वी लँडिंग केलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. इस्त्रोचे शास्त्रज्ञ, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचं अनेकांनी कौतुक करत भारताला इतिहास रचण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानलं आहे. परंतु आता चांद्रयानच्या यशात मराठवाड्याचाही मोठा वाटा असल्याचं समोर आलं आहे. याशिवाय विदर्भातील एका शहरातून चांद्रयानसाठी लागणारी सामग्री नेण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळं आता चांद्रयान चंद्रावर पोहचलं असलं तरी त्यामुळं मराठवाडा आणि विदर्भात मोठा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
ट्रेंडिंग न्यूज
इस्त्रोकडून तयार करण्यात आलेल्या चांद्रयान ३ च्या निर्मितीसाठी लागणारे थर्मल शिल्ड आणि सिल्व्हर स्टलिंग ट्यूब विदर्भातील खामगाव एमआयडीसीतून नेण्यात आले होते. खामगाव औद्यागिक वसाहतीत ही उपकरणं अतिशय उत्तम दर्जाची मिळत असल्यानेच इस्त्रोकडून त्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद एमआयडीसीतील सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या कंपनीत तयार झालेले कपॅसिटर्स चांद्रयानसाठी पाठवण्यात आले होते. त्यामुळं आता खामगाव आणि औरंगाबाद या दोन शहरांतून चांद्रयानासाठी लागणारी उपकरणं पाठवण्यात आली. त्यामुळं दोन्ही शहरांचा देखील चांद्रयानाच्या यशात वाटा असल्याचं बोललं जात आहे.
थर्मल शिल्ड आणि सिल्व्हर स्टलिंग ट्यूबमध्ये तब्बल ९० टक्के चांदी असते. याशिवाय दहा टक्के कॉपरही त्यात असतं. औरंगाबादच्या सीटीआर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या कंपनीतून लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी लागणारं कपॅसिटर पुरवण्यात येतं. परंतु यावेळी इस्त्रोला चांद्रयानाच्या मोहिमेसाठी कपॅसिटरची गरज होती. त्यामुळं कंपनीने इस्त्रोला कपॅसिटरचा पुरवठा करत चांद्रयानाच्या यशात मोठा वाटा उचलला आहे. त्यामुळं आता मराठवाडा तसेच विदर्भातील औद्योगिक कंपन्यांची चांद्रयान मोहिमेत मोठी मदत झाल्यामुळं अनेकांनी आनंद व्यक्त करत शास्त्रज्ञांचं कौतुक केलं आहे.