मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BJP vs Thackeray : सावरकरांवर नौटंकी नको, काँग्रेसची साथ सोडा; भाजपचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान!

BJP vs Thackeray : सावरकरांवर नौटंकी नको, काँग्रेसची साथ सोडा; भाजपचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान!

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 27, 2023 02:42 PM IST

Uddhav Thackeray On Savarkar : सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या सभेतून काँग्रेसला चांगलंच खडसावलं होतं.

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray (HT)

Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या मालेगावात शिवगर्जना सभेतून सावरकर यांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर जोरदार आगपाखड केली आहे. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, लोकशाहीसाठी एकत्र यायचं असेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांबाबत बोलताना काळजी घ्यावी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना काँग्रेसची साथ सोडण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे.

नागपुरात बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, काँग्रेसने आतापर्यंत १०० वेळा सावरकरांचा अपमान केला आहे. त्यामुळं सावरकरांच्या अपमानावरून उद्धव ठाकरेंनी नौटंकी करण्याचं कारण नाही. हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसची साथ सोडावी, केवळ तोंडाच्या वाफा घालवू नयेत, असा पलटवार बावनकुळे यांनी ठाकरेंवर केला आहे. भारत जोडो यात्रेवेळी नाना पटोले यांनी सावरकरांचा अपमान केला होता. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी देखील सावरकरांचा अपमान केला, त्यामुळं उद्धव ठाकरे काँग्रेसची साथ सोडतील, असं मला वाटलं होतं. परंतु ते काही झालं नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

संजय राऊत हे फुसका बार- बावनकुळे

सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधीची भेट घेऊन त्यांना आमची भूमिका समजावून सांगणार असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, संजय राऊत हे फुसका बार आहेत. यापूर्वी राहुल गांधींनी अनेकवेळा सावरकरांचा अपमान केला. त्यानंतर संजय राऊत हे अनेकदा संसदेत त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. परंतु याबाबत जाब विचारण्याची हिंमत त्यांच्यात कधीही झाली नाही, असं म्हणत बावनकुळे यांनी राऊतांना टोला हाणला आहे.

IPL_Entry_Point