Padalkar vs Ajit Pawar : पडळकरांची टीका, बावनकुळेंची माफी; अजित पवारांसमोर भाजप नतमस्तक?-chandrashekhar bawankule on ajit pawar and gopichand padalkar in pune today ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Padalkar vs Ajit Pawar : पडळकरांची टीका, बावनकुळेंची माफी; अजित पवारांसमोर भाजप नतमस्तक?

Padalkar vs Ajit Pawar : पडळकरांची टीका, बावनकुळेंची माफी; अजित पवारांसमोर भाजप नतमस्तक?

Sep 22, 2023 09:28 AM IST

Padalkar vs Ajit Pawar : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर आता भाजपकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

Gopichand Padalkar vs Ajit Pawar
Gopichand Padalkar vs Ajit Pawar (HT)

Gopichand Padalkar vs Ajit Pawar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टोकाची भूमिका घेतली आहे. पडळकरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर 'लबाड लांडग्याचे लबाड पिल्लू' अशा भाषेत टीका केली असून सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला आहे. त्यामुळं आता सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. त्यातच आता पडळकरांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांची माफी मागितली आहे. याशिवाय बावनकुळे यांनी पडळकरांना समज देण्याची संधी सोडली नाही.

पुण्यातील कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमदार गोपीचंद पडळकरांनी यापूर्वी देखील अजित पवारांवर टीका केलेली आहे. त्यावेळी मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांना समज दिली होती. कारण राज्यातील प्रत्येक नेत्याला एक प्रतिष्ठा असते, त्याला धक्का लावण्याचा अधिकार कुणालाही नाहीये. पडळकरांच्या वक्तव्याने कुणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता पडळकरांच्या वक्तव्यानं भाजप आणि राष्ट्रवादीत सुरू झालेला वाद शमण्याची चिन्हं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वार सुरूच आहे.

आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कोणत्याही पक्षातील नेत्यांवरील अनुचित वक्तव्य भाजपने मान्य केलेली नाहीत. धनगर समाजाला न्याय मिळावा, ही आमची देखील मागणी राहिलेली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात योग्य बाजू न मांडल्यामुळं आरक्षण टिकू शकलेलं नाही, असं म्हणत बावनकुळेंनी धनगर आरक्षणाचं खापर उद्धव ठाकरे यांच्यावर फोडलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीचे नेते केवळ राजकारण करत असून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंडिया आघाडीतील घटकपक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदू धर्माचा अपमान केला असून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Whats_app_banner