Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

Chandrapur News: पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

Dec 16, 2024 12:45 PM IST

Chandrapur News : पोलिस भरतीचा सराव करत असतांना पोहण्याचा सराव करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर हेतहे घडली आहे.

पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत
पोलीस व्हायचं स्वप्न राहिलं अधुरं! चंद्रपूर येथे पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण-तरुणीचा करुण अंत

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरणा तालुक्यातील भोयगाव येथे पोलिस भरतीचा सराव करत असतांना पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने पैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. यामुळं दोघांचेही पोलिस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं आहे. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हलहळ व्यक्त केली जात आहे.

संध्या शिंदे (वय २०), युगल नागपुरे (वय १९) अशी नदीत बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरातील आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श चिवंडे यांचे पोलीस भरतीसाठी सराव करण्यास प्रशिक्षण केंद्र चालवतात. त्यांच्या संस्थेत एकूण ३६ विद्यार्थी असून त्यांना व्यायाम करण्यासाठी ते रविवारी धानोरा-भोयगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर घेऊन गेले होते. विद्यार्थ्यांनी व्यायाम केल्यावर त्यातील काही प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हे पैनगंगा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी उतरले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे संध्या शिंदे व समीक्षा शेंडे हे दोघे नदी पत्रातील डोहात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी युगल नागापुरे याने पाण्यात उडी मारली. 

मात्र, तो देखील पाण्यात बुडाला. पाण्यात बुडणारी समीक्षा शेंडे ही युवती कशीबशी बाहेर आली. मात्र, संध्या शिंदे व युगल नागापुरे या दोघांचा बुडून मृत्यू झाला. उपस्थित इतर विद्यार्थ्यांनी दोघांचा पाण्यात शोध घेतला. थोड्या वेळाने समीक्षा शिंदे हिचा मृतदेह हा पाण्या बाहेर काढला. तर युगलचा मृतदेह आढळून आला नाही. रात्री, उशीर झाल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

आई -वडिलांचा आधार हरवला

युगल पुणेश्वर नागपुरे हा गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या सोनापूर गावातील रहिवाशी होता. त्याच्या वडिलांची आर्थिक स्थिती बेताची असून त्याला एक बहीण त्याला आहे. युगल हा एकुलता एक होता. त्याला पोलीस व्हायचं होतं. आई-वडिलांचा तो एकुलता एक असल्याने त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर