Chandrapur: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक; १९ वाघांची शिकार केल्याचा संशय
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrapur: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक; १९ वाघांची शिकार केल्याचा संशय

Chandrapur: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक; १९ वाघांची शिकार केल्याचा संशय

Jan 27, 2025 02:59 PM IST

Ajit Rajgond Arrested: बहेलिया टोळीतील म्होरक्या अजित राजगोंड याला अटक करण्यात आली आहे.

चंद्रपूर: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक
चंद्रपूर: वाघांची शिकार करणाऱ्या बहेलिया टोळीच्या म्होरक्याला अटक

Bahelia Gang News: वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीतील म्होरक्याला अटक चंद्रपूरातील जंगलातून अटक करण्यात आली. अजित राजगोंड असे त्याचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात झालेल्या अनेक वाघांच्या त्याने शिकारी केल्याची माहिती आहे. मध्य प्रदेशातील बहेलिया टोळीने अवघ्या दोन वर्षात १९ वाघांची शिकार केल्याची संशय आहे. अजित राजगोंड अटक करण्यात आल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या कारवाईनंतर राज्याला रेड अलर्ट देण्यात आले आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पासह परिसरासह १०० हून अधिक वाघ आहेत. वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेला आरोपी अजित राजगोंड याला वनविभागाने अटक केली. मध्यप्रदेश येथील बहेलिया टोळी वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात आहे. या टोळीने देशभरातील अनेक वाघांची शिकार केली आहे. एवढेच नव्हेतर या टोळींची आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे. बहेलिया टोळीने २०१३- २०१५ दरम्यान १९ वाघांची शिकार केल्याची संशय आहे. या शिकारींच्या मागे अजित आणि त्याचे दोन भाऊ केरू आणि कट्टू हे प्रमुख सूत्रधार होते.

वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने २०१५ मध्ये अजितला तिरुपती येथून अटक करण्यात आली. यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षा ठोठावली. माज्ञ, गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात अजित जामिनावर तुरुंगातून बाहेर आला. अशातच वाघांसाठी नंदनवन ठरलेल्या चंद्रपूरातून अजितला अटक करण्यात आल्याले एकच खळबळ उडाली. अजित या भागात गेल्या किती दिवसांपासून आहे ? त्याने या 'भागात वाघांच्या शिकारी केल्या का? त्याच्या टोळीचे आणखी किती लोक या भागात आहे? यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वनविभागाला या कुख्यात आरोपीविषयी माहिती नव्हती. चौकशीदरम्यान त्याची ओळख समजल्यानंतर वनविभागाला धक्का बसला. त्याला २६ जानेवारीला वन कोठडी सुनावण्यात आली. त्याची वनविभागाकडून चौकशी सुरू आहे.

भारताच्या व्याघ्र गणनेच्या ताज्या आकडेवारीनुसार देशातील वाघांची संख्या पुन्हा एकदा वाढली आहे. दरम्यान, २०२२ पर्यंत भारतात वाघांची संख्या ३ हजार १६७ झाली आहे. २०१८ नुसार जुलै २०१९ मध्ये प्रकाशित झालेल्या व्याघ्र गणनेनुसार भारतात २ हजार ९६७ वाघ होते. मागील चार वर्षांत देशातील वाघांची संख्या २०० किंवा ६.७ टक्के वाढली आहे. भारतात २००६ मध्ये १ हजार ४११ वाघ, २०१० मध्ये १ हजार ७०६ आणि २०१४ मध्ये भारतात २ हजार २२६ वाघ होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर