मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  chandrakant patil on bike: गर्दी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी घेतला वाहतूक पोलिसाच्या बाइकचा आधार

chandrakant patil on bike: गर्दी टाळण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी घेतला वाहतूक पोलिसाच्या बाइकचा आधार

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 31, 2022 04:38 PM IST

Pune Ganesh Festival News : पुण्यात आज जल्लोषात तब्बल दोन वर्षानंतर गणरायाची स्थापना झाली. पुण्यात मध्यवस्तीतील अनेक रस्ते बंद करण्यात आले होते. गणेश मंडळाच्या मिरवणुकीमुळे रस्ते गजबजले होते. या गर्दीतून वाट काढणीसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाहनांचा ताफा टाळून एका ट्रॅफिक पोलिसाच्या दुचाकीवर मागे बसून प्रवास केला.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

chandrakant patil on bike: ढोल ताशांचा गजरात आज पुण्यात तब्बल दोन वर्षानी गणेशोत्सव साजरा केला आज आहे. निर्बंध मुक्त सोहळा होणार असल्याने पुण्यात चैतन्याचे वातावरण आहे. या गणरायाचे स्वागत करण्यासाठी पुण्य नगरी सज्ज झाली आहे. पुण्यातील मानाचे पाच गणपती देखील विराजमान झाले. या गणपती मंडळात गणरायाच्या स्थापनेसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज उपस्थित होते. त्यांनी कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यावर पुढे भाऊ रंगारी गणपती मंडळात जाण्यासाठी निघाले. मात्र, गर्दी असल्याने त्यांच्या शासकीय ताफ्यात जाणे शक्य नसल्याने त्यांनी ही वाहतूक कोंडी टाळत एका वाहतूक पोलिसांच्या दुचाकीवर मागे बसून पुढे जाणे पसंत केले. त्यांचा हा व्हिडिओ आज चांगलाच व्हायरल झाला.

'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' अशा जयघोषात गणरायाचे पुण्य नगरीत स्वागत करण्यात आले. कोरोनाच्या निर्बंधांमुळं गेले दोन वर्ष गणेशोत्सव जल्लोषात साजरा होऊ शकला नाही. यावर्षी मात्र, निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत आहे. घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. सार्वजनिक गणेश मंडळाली आकर्षक रथातून गणरायला मंडपात आणले.

उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात मानाच्या पाच गणपती मंडळाच्या स्वागतासाठी पुण्यात आले होते. चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचं ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीचे दर्शन घेलते. त्यानंतर भाऊ रंगारी गणपतीच्या प्रतिष्ठापणेसाठी जायचे होते. मात्र, रस्त्यावर मोठी गर्दी असल्याने त्यांना शासकीय ताफ्यात जाणे शक्य नव्हते. यामुळे त्यांनी वेळ न घालवता एका ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या मोटरसायकलवर मागे बसून पुण्यातील गणपतींचे दर्शन घेतले. चंद्रकांत पाटील हे भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या रथामध्ये बसत या रथाचे सारथ्य देखील त्यांनी केले.

मागील दोन वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यानं सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. मात्र, यावर्षी सर्व नियम आणि निर्बंध शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यात येणार असल्यानं गणेश भक्तांमध्ये उत्साह आज चांगलाच उत्साह पाहायला मिळाला.

WhatsApp channel