मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  १२०० ते १७०० कालखंडात देशाला दृष्ट लागली; मंत्री चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

१२०० ते १७०० कालखंडात देशाला दृष्ट लागली; मंत्री चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 15, 2022 01:09 PM IST

Chandrakant Patil: राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण झाले. यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांना कळावा यासाठी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा दिली."

मंत्री चंद्रकांत पाटील
मंत्री चंद्रकांत पाटील (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Chandrakant Patil: नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर स्वातंत्र्याचा अर्थ सर्वांना कळावा यासाठी सबका साथ, सबका विकास अशी घोषणा दिली असं राज्याचे उच्च आमि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर ते बोलत होते. नागरिकांना स्वातंत्र्याचा अर्थ कळावा यासाठी दिलेल्या घोषणांपैकीच एक घरोघरी तिरंगा ही एक होती. त्यामुळेच सर्वसामान्यांच्या घरी तिरंगा फडकला. मिळालेलं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी सर्वांना प्रयत्न करावे लागतील असंही चंदर्कांत पाटील यावेळी म्हणाले.

कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास २८ लाख घरांमध्ये तिरंगा फडकला. बाजारात तर तिरंगा मिळत नव्हता, काही ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करावी लागली अशी स्थिती होती. काही ठिकाणी प्रभात फेरी निघाली, काही ठिकाणी रॅली निघाल्या, यामुळे देशाबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण झाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "देशाला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. देश समृद्ध होता, मात्र इसवी सन १२०० ते १७०० या कालावधीत देशाला दृष्ट लागली. देशावर मुघलांचे आक्रमण या कालावधीत झाले. पुढे पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि त्यानंतरचा दीडशे वर्षाचा इंग्रजांचा कालावधी होता."

पंडित जवाहलाल नेहरू, महात्मा गांधीजी, सुभाष चंद्र बोस, सरदार वल्लभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिकारक सुखदेव, राजगुरू, सुभाष बाबू या प्रत्येकाने आपल्या परीने कोणी शांततेच्या मार्गाने कोणी क्रांतिकारी क्रांतिकारी मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला अंसही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, देशाला मिळालेले स्वातंत्र्य टिकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली. कायद्याची रचना त्यांनी केली आणि ती घटना पुढील हजारो वर्षे बदलावी लागणार नाही. देश स्वातंत्र झाला तेव्हा देशामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती. मात्र आता नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर आपण लष्करी सामग्रीसुद्धा निर्यात करत आहोत. नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास नारा दिला. सर्वसामान्यांच्या समस्येला हात घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

IPL_Entry_Point