Maharashtra weather update: राज्यात आज विदर्भात काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रामुख्याने, आज गडचिरोली जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज आहे. तर वर्धा, नागपूर, यवतमाळ, जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यावर शनिवारी उत्तर ओरिसापासून पूर्व विदर्भापर्यंत असलेली द्रोणीका रेषा आज सबहिमालय वेस्ट बेंगालपासून कोस्टल आंध्रप्रदेशा पर्यंत आहे. तर एक द्रोणिका रेषा मराठवाड्यापासून कर्नाटक व तमिळनाडू मधून कमोरीन एरिया पर्यंत जात आहे. त्यामुळे विदर्भ व लगतच्या मराठवाड्यावर आद्रता वाढत असून यामुळे पुढील काही दिवस मराठवाडा व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भात गारपिट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या इतर भागात हवामान कोरडे राहणार असून काही ठिकाणी तापमानात वाढ होणार आहे.
विदर्भात आज गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात मेघा गर्जना व विजांच्या कडकडाटासह पावसाची व गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या जिल्ह्यात आज गेलो अलर्ट देण्यात आला आहे. आज १७ तारखेला गोंदिया, भंडारा व नागपूर जिल्हात मेघगर्जना व विजांच्या कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर १८ मार्चला गोंदिया भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडात व सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. तर १९ मार्चला अमरावती भंडारा व नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
पुण्यात पुढील पाच-सहा दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहील. पुढील ४८ तास पहाटे धुके पडण्याची शक्यता आहे. २१ मार्चपर्यंत कमाल व किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर मात्र कमाल व किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.