Pune loksabha Election : पुण्यात आज लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळ पासून मतदान सुरू आहे. अनेक तरुण आणि वृद्ध मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावल. सेरेब्रल पाल्सी आणि अधू दृष्टी असलेल्या एका तरुणाने देखील मतदांन करण्याची इच्छा दर्शविली. निवडणूक अधिकाऱ्यांनी या मुलाची मतदान करण्याची इच्छा पूर्ण केली आहे. या मुलाने आजारी असतांना देखील त्याचे राष्ट्रीय कर्तव्याचा हक्क बजावला आहे.
नचिकेत असे या मतदराचे नाव आहे. नचिकेत हा सेरेब्रल पाल्सीने ग्रस्त आहे. त्याची दृष्टी देखील अधू आहे. त्याचे मतदान केंद्र हे घराजवळ नसल्याने ते बदलून घराजवळचे मतदान केंद्र मिळावे किंवा वाहनाची व्यवस्था करावी अशी विनंती त्याच्या पालकांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे केली होती. निवडणूक आयोगाने त्याच्या या विनंतीला मान दिला, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी तात्काळ प्रतिसाद देत मदतनीसासह वाहन नचिकेच्या घरी पाठवले. तसेच त्याला मतदान केंद्रवर नेण्यासाठी व्यवस्था केली. नचिकेतने मतदानांन केंद्रांवर जात त्याचा मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्याच्या चेहेऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता.
शारीरिकदृष्ट्या विकलांग (पीडब्ल्यूडी) मतदार असलेला नचिकेत शहरातील फ्लोरिडा इस्टेट केशव नगर, मुंढवा येथे राहतो. त्याचे मतदार यादीतील नाव हे ३१ केशवनगर मुंढवा लिटिल आइन्स्टाईन प्रीस्कूल मध्ये होते. हे मतदान केंद्र त्याच्या घरापासून दूर होते. त्यामुळे हे केंद्र बदलून जवळचे मिळावे अशी विनंती त्याचे वडील नीरज कुमार सिन्हा यांनी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीसाठी उशीर झाल्याने मतदान केंद्र बदलून देता आली नाही. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी नचिकेतला मतदान केंद्रावर आणण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले, त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी नचिकेतसाठी गाडी पाठवून त्याला मतदान केंद्रवार आणून त्याच्याकडून मतदान करूंग घेतले. मतदानानंतर नीरज कुमार सिन्हा यांनी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणूक प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले.
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वाहन व प्रतिनिधी तसेच सहायक पाठवून माझा मुलगा नितीन याला त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करण्याची व्यवस्था केली. मतदानानंतर नचिकेतच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे, असे नीरज कुमार सिन्हा म्हणाले.