मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील प्रवास झाला सुसाट.. आता ११० Kmph वेगाने धावणार गाड्या

पुणे ते मिरज रेल्वे मार्गावरील प्रवास झाला सुसाट.. आता ११० Kmph वेगाने धावणार गाड्या

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 26, 2024 09:28 PM IST

Pune Railway Division : मध्य रेल्वेच्यापुणे विभागामध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.

central railway
central railway

वंदे भारत ट्रेन सुरू झाल्यापासून रेल्वे प्रवास गतिमान झाला आहे. त्याचबरोबर अन्य रेल्वे गाड्यांचाही वेग वाढवला जात आहे. प्रवासासाठी कमी वेळ लागावा आणि प्रवाशांच्या वेळेत बचत व्हावी त्याचबरोबर त्यांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी मध्य रेल्वे प्रयत्नशील आहे. रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत.

मध्य रेल्वेच्यापुणे विभागामध्ये रेल्वे गाड्यांचा वेग वाढण्यासाठी मागील काही दिवसांपासून पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सिग्नल काम, ओव्हर हेड इक्विपमेंट नियमन, लोहमार्गांची संख्या वाढवणे, मार्ग दुहेरीकरण तसेच अन्य तांत्रिक कामे पूर्ण करण्यात आले. ही कामे पूर्ण झाल्यामुळे पुणे विभागातील रेल्वे गाड्यांचा कमाल वेग आता ताशी१०० वरून ११० किलोमीटर प्रतितासवर पोहोचला आहे.

पुणे विभागातील रेल्वे गाड्यांच्या कमाल वेगात वाढ झाली आहे. पुणे ते साताऱ्या दरम्यान तसेच सातारा ते मिरज व मिरज ते कोल्हापूर मार्गावरील रेल्वे गाड्यांचा कमाल वेग ११० किलोमीटर प्रतितास झाला आहे.

पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या स्थानकांपैकी एक असल्याने या स्थानिक स्तरावरील सुधारणांचा परिणाम पुण्यातून ये-जा करणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांवर होणार आहे.रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण तांत्रिक तपासणी केल्यानंतरच रेल्वे गाड्यांच्या वेगात वाढकरण्याचा निर्णय घेतला आहे.

WhatsApp channel