मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Madhya railway : मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक कारणाने विस्कळीत ! ठाणे, डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी

Madhya railway : मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक कारणाने विस्कळीत ! ठाणे, डोंबिवली स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी

May 21, 2024 09:42 AM IST

Madhya railway : मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. यामुळे सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन २० मिनिटे उशीराने धावत आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आहे. (HT)

Madhya railway issue : मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी पुन्हा विस्कळीत झाली आहे. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेन यामुळे २० मिनिट उशिराने धावत आहेत. काही तांत्रिक कारणामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असल्याची माहिती आहे. या बिघडामुळे शहाड, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्टेशवर चाकरमान्यांची गर्दी झाली आहे. त्यामुळे सकाळी कामावर निघालेल्या लोकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Lok Sabha Polls Phase 5 : पाचव्या टप्प्यात राज्यात ५४.३३ तर देशात ५९ टक्क्यांहून अधिक मतदान; मतदानाचा टक्का घटला

मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाल्याने आज नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक अडचणीमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गावर धावणाऱ्या लोकल ट्रेन यामुळे २० मिनिट उशिराने धावत आहेत. त्याच्या फटका कामावर जाणाऱ्या नागरिकांना बसला आहे. रेल्वे स्टेशन आणि परिसरात चाकरमान्यांसह प्रवशांची गर्दी कल्याण रेल्वे स्थानकावर झाली होती.

Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी गु्न्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या बिल्डर विशाल अग्रवालला अखेर अटक

रेल्वेचे अधिकारी हा बिघाड दुरुस्त करण्याच्या कामात गुंतले आहे. मात्र, अद्याप हा बिघाड दुरुस्त झालेला नाही. मुंबईत लोकलसेवा ही प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. लोकलसेवेला मुंबईची जीवन वाहिनी म्हटले जाते. अशातच गेल्या काही दिवसांपासून या सेवेत काही तांत्रिक कारणांमुळे होणाऱ्या बिघाडामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

काल देखील लोकल सेवा झाली होती विस्कळीत

देशातील ४९ जागांवर सोमवारी मतदान झाले. मुंबईत देखील सहा जागांवर मतदान झाले. मतदानाच्या दिवशी मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. तांत्रिक अडचणीमुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत आहे. यामुळे कल्याणकडून मुंबईकडे येणाऱ्या सर्व गाड्या १५ मिनिट उशिरा धावत होत्या. त्याच्या फटका निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसला. सकाळी लवकर मतदान करुन कार्यालयात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा फटका बसला होता. या बिघाडामुळे रेल्वे स्टेशन आणि परिसरात चाकरमान्यांसह प्रवशांची गर्दी झाली होती.

टी-२० वर्ल्डकप २०२४