Central Railway: सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय-central railway to run additional special trains from ccmt to ayodhya details inside ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Central Railway: सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

Central Railway: सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

Aug 25, 2024 01:49 PM IST

CCMT To Ayodhya Additional Special Train: मध्य रेल्वेने सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन
सीसीएमटी ते आयोध्यादरम्यान विशेष ट्रेन (HT)

Central Railway Special Trains: प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उत्तर प्रदेशातील आयोध्यादरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑगस्ट २०२४ पासून विशेष ट्रेन सुरू केल्या जाणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ येत्या २९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.२० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्येतून ३१ ऑगस्टला रात्री ११.४० ला निघेल आणि १ सप्टेंबरला सकाळी ८.१५ मुंबईत पोहोचेल.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबणार?

कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर आणि लखनऊ स्थानकांवर गाडी थांबेल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सोमवारी या गाडीसाठीचे आरक्षण खुले होणार आहे.

'या' गाड्यांच्या वेळेत बदल

रेल्वेगाड्यांचा वक्तशीरपणा सुधारण्यासाठी सप्ताहिक गाड्यांच्या वेळत बदल करण्यात आले आहे, ज्यात पुणे-सीएसएमटी डेक्क्न एक्स्प्रेस ( गाडी क्रमांक- ११००८), नागरकोविल-सीएसएमटी (गाडी क्रमांक- १६३५२), तिरुवनंतपुरम-सीएसएमटी (१६३३२) या गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांच्या वेळेत ५ ते १५ मिनिटांचा बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेचे प्रवाशांना आवाहन

गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी सुधारित वेळेची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. गाड्यांची सुधारित वेळ आणि अंमलबजावणीच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आहे.

मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेने मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला. मध्य रेल्वेवर सकाळी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. तर, हर्बर मार्गावर सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. तर पश्चिम रेल्वेवर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक असेल मेगाब्लॉक दरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी सेक्शनमध्ये विशेष लोकल चालवल्या जातील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लोकल सेवा उपलब्ध असतील. त्याचबरोबर बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाइन सेवा उपलब्ध असतील.

विभाग