मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai : मध्य रेल्वेच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप; सहनशीलतेचा अंत पाहू नका म्हणत आंदोलनाचा इशारा

Mumbai : मध्य रेल्वेच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप; सहनशीलतेचा अंत पाहू नका म्हणत आंदोलनाचा इशारा

May 31, 2024 08:21 AM IST

Mumbai railway Mega Block: मुंबई ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस घेण्यात आलेला जंम्बो मेगा ब्लॉकला प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

तीन दिवस घेण्यात आलेला जंम्बो मेगा ब्लॉकला प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे.
तीन दिवस घेण्यात आलेला जंम्बो मेगा ब्लॉकला प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे.

Mumbai Mega Block: मुंबई ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस घेण्यात आलेला जंम्बो मेगा ब्लॉकला प्रवासी संघटनांनी विरोध केला आहे. प्रवाशांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका म्हणत या विरोधात आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्याआधी प्रवासी संघटनांशी चर्चा करायला हवी होती. तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी वाहतुकिके पर्याय उपलब्ध करून द्यायला हवे होते अशी मागणी देखील संघटनांनी केले आहे. एक जारी लोकल फेरी रद्द झाली तरी तरी प्रवाशांचे हाल होतात. तीन दिवसांच्या ब्लॉकमध्ये, तब्बल ९३० लोकल फेऱ्या रद्द झाल्याने याचा फटका लाखो मुंबईकरांना बसणार असल्याने हा निर्णय मागे घेण्यात यावा अशी देखली मागणी करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Traffic Update: पुणेकरांनो घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचा! मेट्रो कामासाठी गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत मोठा बदल

मुंबई ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाटांच्या रुंदीकरण्यासाठी तीन दिवस मेगा ब्लॉक घोषित करत ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रस्ते वाहतुकीवर ताण येणार आहे. त्यामुळे या काळात शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी कंपन्यांतील नोकरदार वर्गाला 'सुट्टी' किंवा 'वर्क फ्रॉम होम' द्यावे अशी मागणी प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. या मेगा ब्लॉक बद्दल पुर्व कल्पना देणे गरजेचे असतांना रेल्वेने तसे केले नाही. यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. या निर्णयाचा नागरिकांना प्रवासादरम्यान त्रास होणार असून गर्दीत किंवा प्रवास करतांना चेंगराचेंगरी झाल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला आहे.

Rahul Gandhi : राहुल गांधी हाजिर हो! सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश

रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवासी संघटना करणार आंदोलन

मध्य रेल्वेच्या या भोंगळ कारभाराविरोधात तसेच ब्लॉक मागे घेण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले. या मेगा ब्लॉक बद्दल ३ एक आठवडाभरपूर्वी माहिती देणे गरजेचे होते. मात्र, एक दिवस आधी माहिती दिल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे . तसेच रस्ते वाहतुकीवर देखील याचा ताण येणार आहे.

Maharashtra Weather update: घराबाहेर पडण्याआधी विचार करा; उष्णतेच्या लाटेने फोडला घाम! 'या' जिल्ह्यात हीट वेव्ह अलर्ट

शनिवारी तब्बल ५३४ फेऱ्या रद्द

उद्या शनिवारी ५३४ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून याचा परिमाण मध्य रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. या प्रवाशांची उद्या चांगलीच तारांबळ उडणार आहे. ब्लॉकमुळे शेकडो रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. सीएसएमटीपर्यंत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, ठाणे, पनवेल, नाशिक व पुण्यापर्यंत चालविण्यात येतील. तर सीएसएमटीवरून सुटणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या दादर, पनवेल, नाशिक स्थानकातून सोडण्यात येणार आहेत.

बेस्ट आली मदतीला; चालवल्या जाणार अतिरिक्त गाड्या

मध्य रेल्वेच्या या मेगा ब्लॉकमुळे बेस्टने जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज ३१ मे रोजी रात्री १२:३० पासून २ जून दुपारी १२:३० पर्यंत नियमित बस फेऱ्यांव्यतिरिक्त अतिरिक्त बस रस्त्यावरून धावणार आहे. बेस्टकडून ५५ अतिरिक्त बसगाड्यांच्या ४८६ अतिरिक्त फेऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रवाशांच्या मदतीला एसटीची बस सेवा

दरम्यान, एसटीबस देखील प्रवाशांच्या मदतीला आले आहेत. ब्लॉक काळात प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कुर्ला नेहरूनगर, परळ व दादर स्थानकातून ठाण्यासाठी ५० जादा एसटी बस चालविल्या जाणार आहेत. मुंबई आगारातील २६ व ठाणे आगारातून २४ गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

या ब्लॉक बाबत मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे सरचिटणीस सिद्धेश देसाई म्हणाले, मध्य रेल्वे मुंबईच्या नागरिकांचा अंत बघत आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या लोकल या रक्तवाहिन्या आहेत. मात्र, ही सेवा तीन दिवस बंद ठेऊन रेल्वेने प्रवाशांची गैरसोय केली आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४