मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागलं आहे. मध्य रेल्वे मार्गावरील ठाकुर्ली आणि कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी दुपारच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. दादर स्थानकावर मोठी गर्दी उसळली आहे.
ठाकुर्ली कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. कर्जत कसाऱ्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. ओव्हरहेड वायर दुरुस्तीस वेळ लागल्याने रेल्वे प्रवाशी लोकलमधून उतरुन प्रवास सुरू लागले.
मध्य रेल्वेने पोस्ट केली आहे की, ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान तांत्रिक समस्येमुळे सोमवारी दुपारी ०२.२८ पासून डाऊन लाईनवर परिणाम झाला आहे.
लोकल रेल्वे सेवा खोळंबल्याने प्रवासी ट्रेनमधून उतरुन पायी चालत ठाकुर्ली रेल्वे स्टेशनकडे चालत जात असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रवाशांना लोकलमधून उतरवण्यासाठी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी डोंबिवली रेल्वे पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी दाखल झाले असून ते प्रवाशांना मदत करताहेत .
ओव्हरहेड वायर तुटल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच वाहतूक सुरळीत होईल रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
डोंबिवलीतील रेल्वे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी स्पष्ट केले की ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) वायरमध्ये बिघाड झाला होता, ज्यामुळे सेवा खंडित झाली.
गिरगावात सकाळच्या सुमारास एका महिलेवर जीवघेणा हल्ला झाला होता.या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महिला कामावर जात असतानाच हा हल्ला करण्यात आला.पतीने ब्लेडने पत्नीवरजीवघेणा हल्लाकेला. सुदैवाने आजूबाजूच्या तरुणांनी हल्ला करणाऱ्याला पकडून ठेवल्याने महिलेचा जीव वाचला. या घटनेची माहिती तात्काळ व्ही पी रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला.
आरोपीने घरगुती वादातून सोमवारी सकाळच्या सुमारात पत्नीवर हल्ला केला व त्याच ब्लेडने स्वतःचे मनगट कापले. मात्र आसपासच्या सतर्क नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला.