Central Railway in Mumbai: मुंबईकरांच्या प्रवासाचे प्रमुख माध्यम असलेल्या लोकलच्या रविवारच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी सुट्टीनिमित्त घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक तपासून तुम्हाला बाहेर पडावे लागणार आहे. रेल्वेच्या मध्यमार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे बदलापूर-खोपोली वाहतूक रविवारी बंद राहणार असून मुंबईकडे येणाऱ्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकात देखील बदल करण्यात आला आहे.
मध्यरेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी (दि १०) ते रविवारी (दि १२) दिवसा कर्जत स्थानकावर पोर्टल उतरवण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक (दुसरा आणि तिसरा) घोषित करण्यात आला आहे. या काळात मध्य रेल्वे कर्जत यार्ड सुधारणा संदर्भात व कर्जत स्थानकावरील पोर्टल अनलोडिंगचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे हा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केला आहे.
शुक्रवारी (दि १०) सकाळी ११.२० वाजता ते १३.०५ दरम्यान, ०१ तास ४५ मिनिटे ब्लॉक घेतला जाणार आहे. भिवपुरी रोड आणि पळसधारी स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून) हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात नेरळ ते खोपोली दरम्यानच्या उपनगरीय सेवा रद्द राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० ते ११.१४ दरम्यान कर्जतसाठी सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथे शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार कर्जत येथून सकाळी ११:१९ ते दुपारी १:०० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणाऱ्या गाड्या नेरळ येथून शॉर्ट ओरीजनेट करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ११०१४ कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस कर्जत-पनवेल मार्गे वळवन्यात आली आहे. त्यामुळे कल्याण येथे उतरू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी पनवेल येथे ही गडी थांबवली जाणार आहे.
तर रविवारी १३.५० वाजता ते १५.३५ दरम्यान, ब्लॉक घेतला जाणार असून या दरम्यान, पळसधरी व भिवपुरी रोड स्थानकांदरम्यान अप, डाउन आणि मिड लाईन (क्रॉसओव्हर वगळून) ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक काळात बदलापूर व खोपोली स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.२० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस खोपोली आणि बदलापूर दरम्यान, वाहतूक ही बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १३.१९ वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत उपनगरी गाडी अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट केली जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १.४० वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत उपनगरी लोकल गाडी ही बदलापूर येथे शॉर्ट टर्मिनेट केली जणार आहे. तर कर्जत येथून १३.५५ वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन आणि खोपोली येथून १३.४८ वाजता सुटणारी खोपोली - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन अंबरनाथ येथून सुटेल. तसेच, कर्जत येथून १५.२६ वाजता सुटणारी कर्जत - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ट्रेन बदलापूर येथून सुटेल.
संबंधित बातम्या