मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, हार्बरच्या लोकल सुरूच राहणार

Mumbai Railway Mega block : मुंबईत रविवारी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, हार्बरच्या लोकल सुरूच राहणार

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 17, 2023 08:09 PM IST

Central Railway Mega block in Mumbai on 19 March 2023 : मुंबईत सेंट्रल लाइनवर रविवारी अभियांत्रिकी कामासाठी रेल्वेनं मेगाब्लॉक घेतला आहे.

Mumbai Railway Mega Block
Mumbai Railway Mega Block

Mumbai Local Train Mega block, 19 March 2023 : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल-दुरस्तीसाठी व विविध अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेनं रविवार, १९ मार्च २०२३ रोजी मुंबईत मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक केवळ सेंट्रल लाइनपुरता मर्यादित असून हार्बरची सेवा सुरळीत सुरू राहणार आहे.

असा असेल ब्लॉक

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्लो ट्रॅकवर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४० या वेळेत सुटणाऱ्या स्लो ट्रॅकवरील गाड्या विद्याविहार स्थानकांपर्यंत जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे नेहमीच्या मार्गावर वळवण्यात येतील.

घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या लोकल गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बरच्या प्रवाशांना दिलासा

हार्बर मार्गावरील प्रवाशांना मात्र रेल्वे प्रशासनानं दिलासा दिला आहे. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. या मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे धावतील.

शनिवारी व रविवारी मध्यरात्री विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे १४० टी रेल्वे क्रेनच्या साहाय्यानं कुर्ला स्थानकावर ८ मीटर रुंद फूटओव्हर ब्रिजचे पाच प्लेट गर्डर बसवण्यासाठी हार्बर मार्गावर रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. १८ (शनिवार) व १९ (रविवार) रोजी मध्यरात्री ११.५० ते पहाटे ४.२० दरम्यान अप जलद मार्गावर विक्रोळी ते माटुंगा आणि डाऊन हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द या असा हा ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत अप आणि डाउन हार्बर मार्गावर लोकल धावणार नाहीत. डाउन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटीवरून रात्री ११.१४ वाजता सुटेल. तर, अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल वडाळा रोडवरून रात्री ११.०८ वाजता सुटेल.

IPL_Entry_Point