मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने २८ जून ते ३० जून या कालावधीत मुंबई-पुणे दरम्यान २ गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे.मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या दोन ट्रेन ३ दिवस रद्द करण्यात येणार आहेत. रेल्वेच्या दुहेरीकरण कामासाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.पुणे-मुंबई-पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस (intercity express)आणि डेक्कन एक्स्प्रेस (deccan express) या दोन गाड्या ३ दिवस धावणार नाहीत.
पुणतांबा कानेगाव आणि दौंड मनमाड विभागात दुहेरीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे तीन दिवस या २ एक्सप्रेस रद्द करण्याचानिर्णय घेतला आहे. या दोन ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे.
पुण्यातून मुंबईकडे नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या खूप आहे. मुंबईहून पुण्याला व पुण्याहूनमुंबईकडे नोकरीनिमित्त किंवा इतर कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची पसंत इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस आहे. या गाड्या तीन दिवसरद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.इंटरसिटी व डेक्कन कमी वेळात प्रवाशांना मुंबईत आणि मुंबईवरून पुण्याला पोहोचवते. मात्र आता पुणतांबा-कानेगाव आणि दौंड-मनमाड विभागात सुरू असलेल्या दुहेरीकरणामुळे रेल्वे विभागाने इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस ३ दिवस रद्दकेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, महिना अखेरीस २८ ,२९ आणि ३० जून रोजी पुणे ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन व इंटरसिटी या दोन रेल्वेरद्द करण्यात आल्या आहेत. पुणे मुंबई पुणे दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस या ट्रेन ३ दिवस धावणार नाहीत.
सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे २८ मे ते २ जून दरम्यान अनेक गाड्य रद्द केल्या होत्या. यात पुणे-मुंबई धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन,डेक्कन एक्स्प्रेस,प्रगती या गाड्यांचा समावेश होता. त्यावेळी पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन दोन दिवस,तर प्रगती सहा दिवस रद्द केली होती. काही गाड्या सीएसएमटी स्थानकाऐवजी दादरपर्यंत सोडण्यात आल्या होत्या. यामुळे पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांची गैससोय झाली होती.
संबंधित बातम्या