मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CBI Raid in Nagpur : सीबीआयची नागपूर-भोपाळमध्ये छापे; एनएचएआयच्या अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

CBI Raid in Nagpur : सीबीआयची नागपूर-भोपाळमध्ये छापे; एनएचएआयच्या अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 04, 2024 02:44 PM IST

CBI Raid in Nagpur and : नागपूर आणि भोपाळ येथे केंद्रीय गुन्हे अन्वेषण (CBI) च्या पथकाने छापे टाकले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या काही अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.

सीबीयाची नागपूर-भोपाळमध्ये छापेमारी; एनएचएआयच्या अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक
सीबीयाची नागपूर-भोपाळमध्ये छापेमारी; एनएचएआयच्या अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक (HT)

CBI Raid in Nagpur and : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (National Highway Authority of India) २ अधिकारी तसेच एका खाजगी कंपनीच्या २ संचालकांसह ६ जणांना २० लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नागपूर आणि भोपाळ येथे छापे टाकून त्यांना अटक केली आहे. या कारवाईत पथकाने तब्बल सव्वा कोटी रुपये जप्त केले आहेत. सीबीआयचे (CBI) अधिकारी तब्बल २ दिवसांपासून या शहरात तळ ठोकून होते.

Mumbai Weather Update : मुंबईत गारठा वाढला! ढगाळ हवामानामुळे मुंबईकर सुखावले; पुढील दोन दिवस असे असेल हवामान

मिळालेल्या माहितीनुसार रस्ते प्रकल्पासाठी प्रलंबित बिलांची प्रक्रिया आणि काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे तसेच प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे जण हे बडे शासकीय अधिकारी आहेत. यातील एक नागपुरातील प्रकल्प संचालक आहे. अरविंद काळे असे त्याचे नाव आहे. तर दुसरा आरोपी ब्रिजेश कुमार साहू हा मध्यप्रदेशातील हरदा येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा उपमहाव्यवस्थापक आहे. भोपाळ येथील एका खासगी कंपनीचे दोन संचालक आणि दोन कर्मचारी अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल यांनी देखील लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Pune Swarget bus stand : बारामती बस स्टँड तुपाशी पुणेकरांचे स्वारगेट बस स्टँड उपाशी; प्रवाशांची गैरसोय

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एका खासगी कंपनीला महामार्गाच्या कामाचे कंत्राट दिले होते. या कंपनीने वेळेवर काम पूर्ण केले. कामाची बिले मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रकल्प व्यवस्थापक अरविंद काळे यांच्याकडे पाठवण्यात आले. कंपनीणे दिलेली बिले प्राधिकरणाने जमा करून घेतले. या दरम्यान, कंपनीने उर्वरित काम पूर्ण केले. या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेत, त्यांना बिले मंजूर करण्यासंदर्भात मागणी केली. त्यांची बिले ही लवकरच मंजूर केले जातील असे आश्वासन काळे यांनी दिले. मात्र, दोन महीने उलटूनही पैसे जमा न झाल्याने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काळे यांची भेट घेत बिलसंदर्भात विचारले. काळे यांनी प्रकल्पाची रक्कम मिळवून देण्यासाठी कार्यालयातील ११ कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर करणार नाही असे थेट सांगितले.

या बाबतची तक्रार कंपनीने सीबीआयकडे केली होती. त्यानुसार दिल्ली सीबीआयचे पथक नागपुरात सापळा रचून बसलेले होते. रविवारी संधी मिळताच सीबीआयने काळे यांना रंगेहात पकडले. काळे यांच्यावर नागपूर विभागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असून त्यातील एक प्रकल्पाचे कंत्राट भोपाळच्या एका कंत्राटदाराला मिळाले होते. काळे हे पदाचा गैरफायदा घेऊन कामे ही त्या कंत्राटदाराला देत असल्याची देखील तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काळे यांच्या नरेंद्रनगर येथील घराबाहेर सापळा रचण्यात आला होता. रविवारी दुपारी भोपाळचा कंत्राटदार काळे यांच्या घरी येत त्याने काळेंना २० लाख रुपयांची लाच दिली. त्याच दरम्यान सीबीआयच्या पथकाने धाड टाकत दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्या घराची झडती घेतली असता अधिकाऱ्यांना तब्बल सव्वा कोटी रुपयांची रक्कम सापडली. तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे देखील सापडली.

IPL_Entry_Point

विभाग