
Car Accident Dadar Mumbai : मुंबईतील दादरमध्ये मध्यरात्री एका धावत्या कारमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दादरच्या टिळक पुलावर ही घटना घडली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही. कारला आग लागल्याचं समजताच चालकाने तातडीने कार थांबवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. त्यानंतर आता पालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. कारला आग लागल्याची घटना समोर येताच पोलिसांनी टिळक पूल वाहतुकीसाठी बंद केला असून दुर्घटनाग्रस्त वाहनाला रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं आहे. परंतु दुर्घटनेत आग संपूर्णपणे जळून खाक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दादरच्या टिळक पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका धावत्या कारमध्ये भीषण आग लागली. वाहनाने पेट घेतल्याचं समजताच चालकाने तातडीने कार रस्त्याच्या कडेला घेत बाहेर उडी टाकली. त्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे. दुर्घटनाग्रस्त कारमध्ये अपघातावेळी किमान तीन ते चार प्रवासी असल्याचं बोललं जात आहे. धावत्या कारमधून अचानक धूर निघत आगीने पेट घेतला. त्यानंतर वेळीच कार थांबवण्यात आल्याने सर्वजण बचावले आहे. या घटनेत कुणालाही गंभीर इजा झालेली नाही. परंतु लागलेल्या आगीत मात्र संपूर्ण कार जळून खाक झाल्याची माहिती आहे.
दादरमध्ये भरधाव कारला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांच्या अथक प्रयत्नानंतर कारला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. त्यानंतर आता दुर्घटनाग्रस्त कारला रस्त्यावरून हटवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी दादरच्या टिळक पुलावरील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. दुर्घटनाग्रस्त कार मार्गावरून हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत केली जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या
