Minister With Criminal Cases : राज्यात हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळ विस्तराला आठवडा झाला तरी अद्याप खाते वाटप करण्यात आलेले नाही. महायुतीतील ३९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात भाजपाचे १९, शिवसेनेचे ११ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनानी शपथ घेतली. मात्र, शपथ घेतलेल्या मंत्र्यांपैकी ६३ टक्के मंत्री हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांच्या हवलात ही माहिती पुढे आली आहे. यात अनेकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. त्यांचा गेल्या रविवारी शपथविधी सोहळा पार पडला. मात्र, शपथविधी घेतलेले ६२ टक्के मंत्री गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
राज्यातील महायुती सरकारचा रविवारी शपथविधी झाल्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह ४२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाले. एकीकडे राज्यात स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील ४२ पैकी २६ म्हणजेच ६२ टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (एडीआर)
खुनाचा प्रयत्न, महिलांशी सबंधित, फसवणूक, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. भाजपच्या २० पैकी १६ म्हणजेच ८० टक्के मंत्र्यांवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातही १० मंत्र्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर तीन मंत्र्यावर खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे नोंद आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स '(एडीआर) आणि महाराष्ट्र इलेक्श्नन वॉच या संस्थांच्या अहवालात २६ मंत्र्यांवर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या ५० टक्के म्हणजेच १२ पैकी ६ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल आहेत. तर तीन मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. राष्ट्रवादीच्या १० पैकी ४ मंत्र्यावर (४० टक्के) गुन्हे दाखल आहेत. तर चार मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. मंत्रिमंडळात अजित पवारांवर सर्वाधिक ४० गुन्हे दाखल आहेत. तर त्यांच्या पाठोपाठ नितेश राणे यांच्यावर ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य विधानसभेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाबरोबर दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे मंत्र्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचे विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे. यात ६२ टक्के मंत्र्यांवर गुन्हे असल्याचे सिद्ध झाले आहे.
या यादीत भाजपाचे मंत्री मंगलप्रभात लोढा हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांची एकूण संपत्ती ४४७ कोटी ९ लाख रुपये आहे. त्यांच्यावर ३०६.२२ कोटींचे कर्ज देखील आहे. तर त्यांच्यानंतर शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांची संपत्ती ३३३ कोटी ३२ लाख रुपये इतकी आहे. यानंतर तिसऱ्या क्रमांक लागतो भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले यांचा. भोसले यांच्याकडे १२८ कोटी ४१ लाख रुपयांची संपत्ती आहे.
या यादीत शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे सर्वात गरीब मंत्री आहेत. त्यांची संपत्ती १ कोटी ६० लाखांच्या घरात आहे. मंत्रिमंडळातील १३ मंत्र्यांचं शिक्षण फक्त ८ वी ते १२ झाले आहे. तर २५ मंत्री १२ पेक्षा जास्त शिकले नाहीत.
संबंधित बातम्या