राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल-case registered against mla sanjay gaikwad who made controversial statements about rahul gandhi ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणं भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Sep 16, 2024 11:09 PM IST

SanjayGaikwad on Rahul Gandhi : आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कलम१९२अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी आज केलं होतं.

संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

Sanjay Gaikwad  controversial statements about Rahul gandhi : लोकसभेतील  विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं शिवसेना शिंदे गटाच्या  आमदाराच्या चांगलंच अंगलट आलं आहे.  बुलढाण काँग्रेसच्या ४ तास ठिय्या आंदोलन करत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर बुलढाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कलम १९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देऊ, असं वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी आज केलं होतं. तसेच याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माफी मागण्याची गरज नसल्याचं म्हणत आमदार गायकवाड आपल्या विधानावर ठाम राहिले होते. 

आमदार गायकवाड या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. राज्यातील काँग्रेस नेते आक्रमक झाले असून त्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली होती. चार तासांच्या ठिय्या आंदोलनानंतर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायिक संहितेच्या कलम ३५१(२),  ३५१ (३),३५१(४) आणि १९२अन्वये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले होते की, राहुल गांधी यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे. जे त्यांच्या पोटात होते, ते आता बाहेर आले आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसूचित जातींना आरक्षण दिले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा आरक्षण रद्द करणार असल्याचा खोटा प्रचार केला गेला. आज काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींची जीभ कापली पाहिजे. जो राहुल गांधी यांची जीप छाटेल त्याला मी ११ लाख रुपये रोख देणार, असे वादग्रस्त वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केलं होतं.

आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली होती. शिंदेजी, वाचाळवीर संजय गायकवाडला वेळीच आवरा... ज्याला लोकप्रतिनिधी म्हणून वागायची अक्कल नाही, त्याने राहुल गांधींवर बोलूच नये. गायकवाडने आधी आपली पातळी पाहावी. प्रसिद्धीसाठी बरळणाऱ्या संजय गायकवाडवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. या सरकारची गुंडशाही, हुकूमशाही, तालिबानशाही जनता पाहत आहे.  

Whats_app_banner