मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Firing In Prabhadevi : प्रभादेवीतील गोळीबार प्रकरण; शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल

Firing In Prabhadevi : प्रभादेवीतील गोळीबार प्रकरण; शिंदे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 11, 2022 03:10 PM IST

Firing In Prabhadevi : गणेश विसर्जनावेळी गोळीबार केल्याच्या आरोपाखाली शिंदे गटाच्या आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shivsena vs Shinde Group In Prabhadevi
Shivsena vs Shinde Group In Prabhadevi (HT)

Shivsena vs Shinde Group In Prabhadevi : गणेश विसर्जनासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता. त्यानंतर आता आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.

प्रभादेवीत गणेश विसर्जनावेळी शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यावेळी आमदार सरवणकर यांनी त्यांच्या पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. याशिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी शहरात अनेक ठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याचबरोबर मुंबईत शिंदे गट आण शिवसेनेच्या समर्थकांमध्ये फायरींग झाल्याच्या आरोपावरून पोलिसांनी याआधीच पाच लोकांना अटक केलेली आहे. परंतु शिवसैनिकांनी आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

त्याचबरोबर मुंबईत शिंदे गटाची गुंडगिरी सुरुच राहिली तर शिवसेनाही मोठ्या ताकदीनं रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिला होता. त्यानंतर आता आमदार सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सावंत यांनी दिलीय.

WhatsApp channel