Pune Police news : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहे. जाळपोळ, वाहनांची तोडफोड, कोयते हातात घेऊन दहशत माजवने या सारख्या बहुतांश गुन्हात अल्पवयीन मुले असल्याचे तपासात पुढे आले आहे. यामुळे आता पुणे पोलिस अशा गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी आता थेट त्यांच्या पालकांवरच गुन्हा दाखल करणार आहे. तसे आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे.
पुण्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अनेक गुन्हात अल्पवयीन मुलांचा सर्वाधिक सहभाग असल्याचे तपासात पुढे आले आहे. दरम्यान वाढत्या गुहेगारीमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर टीका करण्यात येत होती. यामुळे पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरातील पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, तपास अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेच्या युनिटचे अधिकारी यांची पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक घेतली. या बैठकीत गेल्या तीन वर्षात पुण्यातील गुन्हेगारी घटनांचा आढावा घेण्यात आला.
यावेळी वाहन तोडफोडी व जाळपोळीच्या घटनात बहुतांश आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे यापुढील काळात या गुन्ह्यात अल्पवयीन आरोपी आढळल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यासंदर्भात दोषी मुलांच्या पालकांवर देखील गुन्हा दाखल करण्याच्या सूचना आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी प्रवृत्ती कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्यासाठी अल्पवयीन आरोपींची यादी करून त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. पालकांनी मुलांवर नियंत्रण ठेवावे तसेच त्यांना गुन्हेगारी प्रवृत्ती पासून रोखावे, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
गेल्या तीन वर्षांत पुण्यात विविध भागात झालेल्या वाहन तोडफोड, जाळपोळ या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून उपाय योजना केल्या जाणार आहेत. नागरिकांच्या आणि व्यापरांच्या मदतीने समुपदेशनावर भर देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या