Pune Shirur mandavgan farata Murder case : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुऱ्हाळात दारू पिऊन आलेल्या कामगारांमध्ये भांडण झाले. या भांडणात एक जण ऊसाच्या गरम रसात पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. आरोपींनी त्याला दवाखान्यात नेतो असे सांगून त्याला दवाखान्यात न नेता थेट नदीत फेकले. यामुळे या मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणी गुऱ्हाळ मालकाने तक्रार दिली असून त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरजू असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे तर शेरसिंग ओमबीर कुमार व करण अनिल ठाकूर (मूळ गाव शीतलगढी, जिल्हा शामली उत्तरप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे एका गुऱ्हाळात ही घटना घडली आहे. तक्रारदार यांचे गावात गुऱ्हाळ आहे. या ठिकाणी मृत सुरज आणि आरोपी हे काम करत होते. दरम्यान, मृत्यू झालेला सरजूने २९ सप्टेंबरला रविवारी पहाटे दारू पिऊन गुऱ्हाळावर आला. यावेळी त्याने आरोपी शेरसिंग ओमबीर कुमार व करण अनिल ठाकूर यांच्यासोबत भांडण केले. या भांडणात सुरजचा तोल जाऊन तो गुऱ्हाळाच्या कढईत पडला. कढईत उसाचा गरम रस असल्याने सुरज हा गंभीररित्या भाजला.
दरम्यान, गुऱ्हाळ मालक देखील घटनास्थळी आले. दोन्ही आरोपींनी सुरुजला दवाखान्यात घेऊन जातो असे सांगितले. त्यांनी सुरजला दवाखान्यात नेण्यासाठी गुऱ्हाळातून घेऊन गेले. मात्र, त्याला दवाखान्यात न नेता वाटेतच त्याला भीमा नदी पात्रात फेकून देत त्याची हत्या केली.
या घटनेत सुरजचा मृत्यू झाला. दरम्यान, ही बाब गुऱ्हाळ मालकाला समजली. त्यांनी थेट शिरूर पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी माहिती दिली. पोलिसांनी गुऱ्हाळ मालकाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बातम्या