मुंबई: निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दिल्याने राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत आता चंगलीच वाढ होणार आहे. कृषी मंत्री सत्तार हे त्याच्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असतात.
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाला संपत्तीबाबत खोटी माहिती दिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी सिल्लोड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाची दाखल घेत तपास करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, तपासात सत्तार यांनी खोटी माहिती दिल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर सील्लोद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सत्तार यांनी २०१४ आणि २०१९ ची निवडणुकीत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या संपत्ती विषयक प्रतिज्ञा पत्रात वेगवेगळी माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी शंकरपल्ली यांनी याचिका दाखल केल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. दरम्यान, तपासात मालमत्तेत तफावत आढळली असल्याचे न्यायालयाने मान्य करत त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.
सत्तार यांच्यावर जर हे आरोप सिद्ध झाले तर त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे. असे झाल्यास आमदारकी तर रद्द होईलच या सोबतच त्यांना पुढील सह वर्षासाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात येणार आहे. असे झाल्यास सत्तार यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होणार आहे.
महेश शंकरपल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सत्तार यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती. मात्र, तपास समाधान कारण ंन झाल्याने ते दोन वेळा न्यायालयात गेले होते. यकेर तिसऱ्यांदा न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ११ जुलैला न्यायाधीश मीनाक्षी धनराज यांनी सत्तारांविरुद्ध पुरावे तपासत फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.