Pune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Pune Kondhva Gate Accident : 'ते' दोघे फिरायला गेले अन्...! पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Apr 06, 2024 07:16 AM IST

Pune Kondhva Gate Accident : पुण्यात दोन मित्र रात्री जेवण झाल्यावर फिरायला बाहेर पडले. मात्र, एका भरधाव कारने त्यांना पाठीमागून जोरदार (Pune Accident) धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने एकाच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.

पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यातील थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

Pune Kondhva Gate Accident : वाईट वेळ कधी कुणावर येईल याचा भरवसा राहिलेला नाही. पुण्यात दोन मित्र जेवण झाल्यावर सहज फिरण्यासाठी रात्रीच्या सुमारास निघाले होते. मात्र, त्यांचे हे सोबतचे फिरणे अखेरचे ठरले. एका भरधाव कारने पाठीमागून येत दोघांना उडवले. यात गंभीर जखमी झाल्याने एकाचा  मृत्यू झाला तर दूसरा मित्र  गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पुण्यातील शिवणे येथील कोंढवा गेट येथे गुरुवारी रात्री घडली. ही घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात एक भरधाव कार दोघांना पाठीमागून धडक देतांना दिसत आहे.

मनिष नवनाथ तावरे (वय १७) व अजिंक्य केदार पाटील (वय १७) अशी कारने उडवलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कोंढवे धावडे येथील राहणारे आहेत. यातील अजिंक्य पाटील याचा मृत्यू झाला आहे. तर मनीषा तावरे हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी अजिंक्य अरुण आघाडे (वय ३६) या कार चालकाला अटक करण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update : राज्यावर दुहेरी संकट! उष्णतेच्या लाटेबरोबर अवकाळी पावसाची शक्यता; गुडीपाडव्याला हलक्या सरी

पोलिसांनी दिलेल्या महतीनुसार मनीष आणि अजिंक्य हे दोघे गुरुवारी रात्री १० च्या सुमारास जेवण झाल्यावर कोंढवा गेट येथून रस्त्याच्या बाजूने पायी बोलत बोलत जात होते. यावेळी अजिंक्य अरुण आघाडे या कार चालकाने भरधाव वेगाने कार चालवत रस्त्याने जाणाऱ्या मनीष आणि अजिंक्य ह्यांना कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक ऐवढी जोरदार होती की यात दोघेही लांब फेकल्या गेले. यातील अजिंक्य हा हवेत उडून लांब फेकला गेला. या भीषण अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. या नंतर स्थानिक नागरिकांनी दोघांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, अजिंक्य पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मनीष हा गंभीर जखमी असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

ही संपूर्ण घटना सिसिटीव्हीत कैद झाली आहे. या व्हीडिओत दोघे रस्त्यावरून जात असतांना त्यांना कारने उडवले असल्याचे दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून तातडीने फरार कार चालकाचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने मारुती ब्रिझा कार (एमएच १२ व्ही व्ही ४१६३ ) ही शिवणे येथील असल्याचे समजले. पोलिसांनी ही कार येथील स्नेहा विहार सोसायटीमधून ताब्यात घेतली. तर आरोपी अजिंक्य पार्सल आणण्यासाठी हॉटेलमध्ये गेला असता पोलिसांनी त्याला अटक केली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर