Nagpur Accident : नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसीत एक मोठी दुर्घटना घडली आहे. कार शिकत असतांना कारवरील नियंत्रण सुटल्याने ती विहिरीत जाऊन कोसळली. या अपघातात तीन तरूणांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त कार आज सकाळी विहीरीतून बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे समजू शकली नाही.
नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथे कार शिकत असतांना तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूरच्या बुटीबोरी एमआयडीसी परिसरात सोमवारी रात्री ११.३०च्या सुमारास घडली. बुटीबोरी येथे राहणारे तीन तरुण हे कारने एमआयडीसी परिसराच्या दिशेने जात होते. यातील एक तरुण हा कार शिकत होता. यावेळी कारवरील नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ही कठडे नसलेल्या विहिरीत जाऊन कोसळली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी पोलीस, स्थानिक नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. आज सकाळी ही कार क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली. यात तिन्ही तरुणांचे मृतदेह होते. अनेक प्रयत्न करून ही कार विहिरीतून कार बाहेर काढण्यात आली. तिन्ही तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
या कारमध्ये तिघे तरुण होते. यातील एक जण हा कार चालवणे शिकत. कार चालवतांना त्याचा कारवरील ताबा सुटला. यामुळे ही विहिरी थेट कठडा नसलेल्या विहिरीत जाऊन पडली. ही कार वेगात असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे बुटीबोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या परिसरात अनेक कठडे नसलेल्या विहिरी आहेत. या विहीरीमध्ये पडून अनेक जण जखमी अथवा मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे या विहिरी बुजवण्यात याव्या किंवा त्यांच्यावर मजबूत कठडे बसवण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संबंधित बातम्या