मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बीडमध्ये भीषण अपघात, पुण्यातील ६ जणांचा मृत्यू

बीडमध्ये भीषण अपघात, पुण्यातील ६ जणांचा मृत्यू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Aug 14, 2022 09:55 AM IST

Beed Accident: बीडमध्ये कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पुण्यातल्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघात
अपघात

Beed Accident: बीडमध्ये भीषण असा अपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि टेम्पो यांचा हा अपघात झाला आहे. मांजरसुभा पाटोदा रस्त्यावर झालेल्या अपघातात पुण्यातील एका कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील एका कुटुंबातील ६ जण केज तालुक्यात एका कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांची गाडी एका आयशर टेम्पोला धडकली. यात गाडी ट्रकमध्ये अडकली होती, ती काढण्यासाठी क्रेन मागवावी लागली. ती काढण्यासाठी दीड तासांहून अधिक वेळ गेला. इतका वेळ लोक गाडीतच अडकून होते.

ट्रक आणि स्विफ्ट कारच्या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. कारची इतकी जोरदार धडक होती की अडकलेली कार बाजूला करण्यात बराच वेळ गेला. या गाडीत अडकलेल्या लोकांचा मृत्यू झाला. पाटोदा मांजरसुभा रस्त्यावर बामदळे वस्तीजवळ ही घटना घडली.

IPL_Entry_Point