मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक
अविनाश भोसले
अविनाश भोसले
27 May 2022, 8:03 ISTShrikant Ashok Londhe
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
27 May 2022, 8:03 IST
  • प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व BIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- येस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे

पुणे - प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक वBIL कंपनीचे प्रमुख अविनाश भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे. डीएचएफएल- एस बँक कर्ज प्रकरणात ही अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली होती. डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे आणि मुंबईत अनेक ठिकाणी छापेमारी केली होती. आज भोसले यांना सीबीआयने अटक केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख आहेत. अविनाश भोसले यांचे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. काँग्रेस नेते विश्वजित कदम यांचे ते सासरे आहेत.

सीबीआय अधिकाऱ्यांकडून काही दिवसापूर्वी अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी केली होती.

कोण आहेत अविनाश भोसले?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध उद्योजकआहेत. रिअल इस्टेट क्षेत्राचा सम्राट अशी त्यांनी पुण्यात ओळख आहे. त्याचबरोबरअविनाश भोसले हे राज्यमंत्रीव काँग्रेसनेतेविश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधींचा टर्नओव्हर असलेल्याएबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग