मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rupee Bank: उद्यापासून रुपी सहकारी बँकेला टाळं लागणार; RBI ने अखेर केली कारवाई
Rupee Bank
Rupee Bank

Rupee Bank: उद्यापासून रुपी सहकारी बँकेला टाळं लागणार; RBI ने अखेर केली कारवाई

21 September 2022, 16:05 ISTNinad Vijayrao Deshmukh

Rupee Co-operative Bank : रिझर्व्ह बँकेने रुपी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. यामुळे उद्या पासून रूपी बँक आता कायम स्वरूपी बंद होणार आहे.

पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI)ने १० ऑगस्टरोजी रूपी बँकेवर कारवाई करत बँकिंग व्यवसायाचा परवाना रद्द केल्याने उद्या गुरुवारी (दि २२) या बँकेला टाळे ठोकण्यात येणार आहे. त्यामुळे खातेदारांना बँकिंग व्यवहार करता येणार नाही.

ट्रेंडिंग न्यूज

आरबीआयने १० ऑगस्ट रोजी या बँकेचा व्यवसाय परवाना रद्द केला होता. या बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्यामुळे आणि नवे व्यवहार होणे शक्य नसल्याने ही बँक बॅंकिंग नियमांचे पालन करण्यात बॅंक अपयशी ठरली असल्याचा ठपका आरबीआयने लावला होता. ही बँक आपल्या ठेवी दारांसाठी व्यवहार सुरु ठेवण्यास प्रतिकूल नाही असेही आरबीआयने म्हटले होते. बँक आपल्या ठेवीदारांना पैसे परत देऊ शकणार नाही असे आरबीआयने म्हटले असून यामुळे आरबीआयच्या निर्देशानुसार उद्या पासून या बँकेला टाळे लावले जाणार आहे. सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक, महाराष्ट्र यांना देखील बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्याची आणि बँकेसाठी लिक्विडेटर नियुक्त करण्याची विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान बँकेच्या ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडून पाच लाख रुपयापर्यंत ठेवींवर विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार दिला जाणार आहे. ९९ टक्याहून अधिक ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम मिळवण्याचा अधिकार आहे.

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग