Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी-bus and maruti car accident on nandgaon chhatrapati sambhajinagar road three died nashik accident news ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

Nashik Accident : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात; तिघे जागीच ठार, एक बालक गंभीर जखमी

May 14, 2024 02:20 PM IST

Nashik Accident : नाशिकमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर हा अपघात झाला आहे. बस आणि मारुती कारची धडक झाली असून यात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २ वर्षांचा बालक जखमी झाला आहे.

नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहे तर एक बालक गंभीर जखमी झाला आहे.
नांदगाव-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर बस व कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तिघे जण जागीच ठार झाले आहे तर एक बालक गंभीर जखमी झाला आहे.

Nashik Accident : नाशिक येथे एक भीषण अपघात झाला आहे. हा अपघात नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर घडला आहे. आज सकाळी १०च्या सुमारास हा अपघात झाला असून यात बस व मारुती कारची जोरदार धडक झाली आहे. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचा बालक गंभीर झाला आहे.

Pune : पुण्यातील घटना! घरावर काळी छाया असल्याचे सांगत गुंगीचे औषध पाजून मायलेकीचे काढले विवस्त्र फोटो; १५ लाख उकळले

मिळालेल्या माहितीनुसार आज १० च्या सुमारास नाशिक जिल्ह्यातील नांदगाव - छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे जात होती. यावेळी समोरून येणाऱ्या कारची बसला समोरा समोर जोरदार धडक झाली. ही धडक ऐवढी भीषण होती की यात कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेत कार मधील तिघे जण जागीच ठार झाले तर एक २ वर्षांचा चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

Trending News : ऐकावं ते नवलच! नवऱ्यानं कुरकुऱ्याचा पुडा आणला नाही म्हणून बायकोचा घटस्फोटासाठी हट्ट

मृतांमध्ये एक पुरुष तर दोन महिला यांचा समावेश आहे. मृत व्यक्तिंची नावे अद्याप समजू शकली नाही. दरम्यान, बस चालकाने हयगय आणि चुकीच्या पद्धतीने बस चालवल्याने हा अपघात झाला असल्याचा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून मृत तिघांचे शवविच्छेदन करण्यासाठी जवळील दवाखान्यात पाठवण्यात आले आहे. तर जखमी बालकावर उपचार करण्यात येत आहे.

highest fd rates : 'या' चार बँका देतायत एफडीवर सर्वाधिक व्याज; तुमची एफडी कुठं आहे?

ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात

बसचालक बस ही भरधाव वेगात चालवत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. समोर असणाऱ्या वाहनाला ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न बसचालकाने केला. या नादात समोरून येणाऱ्या कारला बसने धडक दिली असा आरोप बसमधील प्रवाशांनी केला आहे. या घटनेत मात्र तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या पूर्वीही झाला होता अपघात

नाशिक येथून सूरत येथे जाणाऱ्या एका बसला देखील काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. या घटनेत ६ जण ठार झाले होते. तर बसचा चक्काचूर झाला होता.

Whats_app_banner