मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Katraj Accident: पुण्यात कात्रज येथे बसची दुचाकीला धडक! दुचाकीस्वारासह दोघे ठार; दोन पादचारी जखमी

Pune Katraj Accident: पुण्यात कात्रज येथे बसची दुचाकीला धडक! दुचाकीस्वारासह दोघे ठार; दोन पादचारी जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jan 16, 2024 12:12 PM IST

Pune Katraj Accident: पुण्यात एका भरधाव बसने दुचाकीला धडक दिली असून या अपघात दुचाकीस्वारासह दोघे जण ठार झाले आहे. तर दोन पादचारी जखमी झाले. ही घटना कात्रज येथे खोपडेनगर येथे घडली.

Pune katraj accident
Pune katraj accident

Pune katraj accident : पुण्यात कात्रज येथील खोपडे नगर येथील उतारावर एका भरधाव बसने दुचाकीस्वराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक आणि त्याच्या मागे बसलेला एक जण ठार झाला आहे. तर दोन पादचारी देखील जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी बसचालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी भारतीय वंशाच्या रामास्वामी यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; नेमके काय झाले ? वाचा

गणेश चोकला आणि गिरीधारीलाल जाट अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर अर्जुन जुजाराम देवासी (वय २३, रा. नेहरुनगर, पिंपरी), प्रवीण प्रजापती (वय २३) हे दोन पादचारी जखमी झाले आहेत. देवासी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी बसचालक किरण रवींद्र महादे (वय २९, रा. खडकवासला) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai weather update : मुंबईकर गारठले! तापमानात मोठी घट; पुढील काही दिवस थंडीचे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास दुचाकीस्वार गणेश आणि सहप्रवासी गिरीधारीलाल हे कात्रज येथील खोपडेनगर परिसरातून निघाले होते. येथील डोंगर उतारावरुन येत असतांना बसचालकाचे बस वरील नियंत्रण सुटले. यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीला बसने धडक दिली. यात दुचाकीस्वार गणेश आणि गिरीधारीलाल हे गंभीर जखमी झाले. तर पादचारी अर्जुन आणि प्रवीण यांना बसचा धक्का लागल्याने ते देखील जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या गणेश आणि गिरीधारीलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश ढमे तपास करत आहेत.

कात्रज येथील तीव्र उतार हे आपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे येथील अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

WhatsApp channel