Nashik Saputara Bus Accident : नाशिक जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. येथील गुजरात महामार्गावरील सापुतारा घाटात आज पहाटे ५.३० च्या दरम्यान, हा अपघात झाला आहे. एक घासगी बस ही तब्बल २०० फुट खोल दरीत कोसळून बस मधील ७ जण ठार झाले आहेत. तर १५ जण हे गंभीर जखमी झाले आहेत. नाशिकवरुण देवदर्शन करून काही भाविक हे गुजरात येथे जात होते. मात्र, वाटेत त्यांच्यावर काळाने घाला घातला. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती मिळू शकली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की, बस घाटात कोसळल्याने तिचे दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बसमधील सर्व जखमी आणि मृत्युमुखी पडलेले नागरिक हे मध्य प्रदेशमधील रहिवाशी असल्याची माहिती आहे.
अपघात मृत्युमुखी आणि जखमी झालेल्यांची नावे अद्याप समजू शकली नाही. ही बस पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास सापूतारा घाटातून जात असतांना हा अपघात झाला. बस मधील सर्व प्रवासी हे नाशिकहून देवदर्शन केल्यानंतर गुजरातकडे देवदर्शन करण्यासाठी प्रवासी जात होते. मात्र, वाटेत त्यांची बस ही घाटात तब्बल २०० फुट खोल दरीत पोहोचली. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या