मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Bus Fire : नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट

Bus Fire : नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार, धावत्या एसटी बसने घेतला अचानक पेट

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 23, 2024 10:11 PM IST

Nashik Bus Fire : नाशिकहून सिन्नरला जाणारी बस मोहदरी घाटात आल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार
नाशिकमध्ये बर्निंग बसचा थरार

नाशिकमध्ये धावत्या एसटी बसने पेट घेतल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहदरी घाटात ही घटना घडली आहे. नाशिकहून सिन्नरला जाणारी बस मोहदरी घाटात आल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या बसमधून १० प्रवासी प्रवास करत होता. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरुप आहेत. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. 

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सिन्रर आगाराची नाशिक ते सिन्नर बस नाशिक-पुणे महामार्गावरून सिन्नरहून नाशिककडे प्रवास करत होती. या बसमध्ये चालक, वाहक यांच्यासहित १० प्रवासी बसमध्ये होते. आग लागलेली बस सिन्नर आगाराची होती. या आगीत बसमधील चालकाची केबिन व मधला भाग जळून खाक झाला. 

चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी आगीतून सुखरुप बचावले. मोहदरी घाटाच्या जवळ आल्यानंतर बसच्या केबिनमध्ये धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांना बस रस्त्याकडेला उभी केली व सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. सर्व प्रवासी खाली उतरताच बसमधील केबिनने पेट घेतला व १० मिनिटात संपूर्ण खाक झाली. सिन्नर MIDC तील फायर ब्रिगेडचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

IPL_Entry_Point

विभाग