Kothrud Army Firing : पुण्यातील कोथरूडमध्ये थरारक घटना! खिडकीची काच भेदून घरात घुसली बंदुकीची गोळी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kothrud Army Firing : पुण्यातील कोथरूडमध्ये थरारक घटना! खिडकीची काच भेदून घरात घुसली बंदुकीची गोळी

Kothrud Army Firing : पुण्यातील कोथरूडमध्ये थरारक घटना! खिडकीची काच भेदून घरात घुसली बंदुकीची गोळी

Feb 21, 2024 12:32 PM IST

Kothrud army firing News : पुण्यात कोथरूड येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लष्करीसरावा दरम्यान, एक गोली ही थेट कोथरूड येथील एका सोसायटीतील सदनिकेत घुसली.

pune kothrud news
pune kothrud news

Pune Kothrud news : पुण्यात दोन वर्षांपूर्वी मेट्रोच्या कामादरम्यान, एके ४७ रायफलची गोळी लागण्याने एक मजूर जखमी झाला होता. अशीच एक घटना पुन्हा घडली आहे. पौड रस्त्यावरील भुसारी कॉलनी परिसरात एका सदनिकेतील गॅलरीची काच फोडून बंदुकीची गोळी शिरल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून ही गोळी लष्कराच्या संशोधन विकास संस्थेच्या आवारातून आली असावी अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Sharad Pawar : भ्रष्टाचाऱ्यांचा नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा; शरद पवारांची टोलेबाजी, अजित पवारांचाही घेतला समाचार

कोथरूड येथील भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स इमारत आहे. या इमारतीत चौथ्या मजल्यावर विनय देशमुख राहतात. दरम्यान, टयांनी ही सदनिका भाड्याने दिली आहे. मंगळवारी दुपारी भाडेकरू सदानिकेत असतांना खिडकीच्या काचेवर कुणीतरी मोठा दगड मारल्यासारखा आवाज आला, तसेच यामुळे खिडकीची काच फुटून घरात काचा पसरल्या. अचानक झालेल्या या घटनेमुळे घरातील व्यक्ति घाबरले, त्यांना खिडकी शेजारी गेले असता खिडकीला मोठे छिद्र पडून खाली बंदुकीची गोळी पडलेली दिसली. या नंतर भाडेकरू यांनी ही घटना सदनिकामालक विनय देशमुख तसेच सोसायटीतील रहिवाश्यांना व पोलिसांना ही दिली.

Ameen Sayani : ‘बिनाका गीतामाला’ फेम निवेदक व देशातील पहिले रेडिओ स्टार अमीन सयानी यांचे निधन

या घटनेची दाखल घेत पोलिस घटनास्थळी आले. पोलीस उपायुक्त संभाजी कदम, कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी सदानिकेची पाहणी केली. आणि चौकशी केली. यावेळी भुसारी कॉलनी परिसरात डोंगर असून, त्या मागे डीआरडीओच्या संशोधन विकास संस्थेची प्रयोग शाळा आहे.

या आवारात शस्त्राच चाचणीसाठी सराव सुरू असतो. हा गोळीबाराचा सराव सुरू असताना गोळी घरात शिरल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आला आहे. या प्रकरणी घातपात नाही, असे पोलीस निरीक्षक देशमाने यांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र, घरातील नागरिक चांगलेच भेदरले आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर