Illegal spaces in 4 city bars demolished in Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याप्रमाणे ठाणे, मुंबई येथील बेकायदेशीर हॉटेल आणि बारवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार काल मुंबईतील काही हॉटेल आणि बारवर कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. या ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे कारवाई दरम्यान आढळले. तर काही हॉटेल बारने अतिक्रम केलेले आढळले.
मुंबई पोलिस व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील चार बिअर बार व हॉटेलमध्ये अनधिकृतपणे मद्य आणि बारबालांवर बंदी असतांना देखील त्यांचा या हॉटेल बारमध्ये होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच हे हॉटेल अनधिकृतरित्या चालवले जात होते. तसेच कारवाई झाली तर बार गर्लला लपवण्यासाठी येथे खास जागा देखील केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी मुंबई पालिकेचे अधिकारी आणि पोलिसांनी मिळून चार हॉटेल बारवर छापा टाकला. या ठिकाणी अनेक बेकायदेशीर गोष्टी होत असल्याचे पथकाला आढळले. यानंतर काही जणांना ताब्यात घेऊन हे चारही हॉटेल आणि बार पाडण्यात आले आहे.
पुण्यात हॉटेल आणि पबमध्ये ड्रग्ससेवन करताना तरुण मुलांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. तसेच राज्य भरात असणाऱ्या बेकायदेशीर हॉटेल आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. त्यानुसार ठाणे, मुंबईतील अनेक अनधिकृत हॉटेल पबवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आला आहे.
या कारवाईबद्दल माहिती देतांना एका अधिकाऱ्याने संगितले की, आम्ही संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. आम्ही महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील अशा चार ते पाच बिअर बारवर व हॉटेलवर छापे टाकले आहेत आणि या हॉटेलचे बेकायदेशीर भाग बुलडोझरच्या साह्याने पाडण्यात आले आहे. हे बिअर बार व हॉटेल बेकायदेशीर कामांमध्ये गुंतले होते. या बाबतच्या अनेक तक्रारी आम्हाला मिळाल्या होत्या. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आम्ही या बारवर छापा टाकला तेव्हा काही छुप्या खोल्यामद्धे बार गर्ल्सना लपवण्यात आले होते. ग्रँट रोड येथील स्टर्लिंग बार आणि आर्यन बिअर बार, पूजा बार डीबी मार्ग आणि सांताक्रूझ पश्चिम येथील गझदर बँड मार्गावरील स्टार नाईट बारवर ही कारवाई करण्यात आली आहे.
बीएमसीने आर्यन बारमध्ये पायऱ्यांखालील अनधिकृत स्टोरेज रूम तयार केली होती. तर स्टर्लिंग बारमध्ये मोकळ्या जागेत उभारण्यात आलेले अवैध पावसाळी शेड आणि स्वयंपाकघर पाडण्यात आले आहे. सांताक्रूझ पश्चिम येथील स्टार नाईट बारवरही अशीच कारवाई करण्यात आली आहे. बारचे एक पार्किंग परिसरात सुरू असलेले अवैध हॉटेल पाडण्यात आले आहे.
संबंधित बातम्या