मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mira Road : मिरा रोडमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', शोभायात्रेतील राड्यानंतर अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त

Mira Road : मिरा रोडमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', शोभायात्रेतील राड्यानंतर अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त

Jan 23, 2024 08:54 PM IST

Mira Road : श्रीराम शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्या मिरा रोड परिसरातील नयानगर भागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

मिरा रोडमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', 
मिरा रोडमध्ये 'बुलडोझर पॅटर्न', 

मुंबईजवळील मिरा रोड परिसरातील नयानगर भागात प्रशासनाकडून बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी (२१जानेवारी) रोजी येथे श्रीराम शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. मिरा रोड परिसरातील नयानगर भागात घडलेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण होते.

या घटनेनंतर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. या भागातील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला असून अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्यात आली आहेत.

राम प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानिमित्त मिरा रोड परिसरात राम शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी नयानगर भागात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर तणावपूर्ण शांतता आहे. आज प्रशासनाच्या वतीने ‘बुलडोझर पॅटर्न’ राबवण्यात आला. मिरा भाईंदर पालिकेने ज्या ठिकाणी ही घटना घडली होती. त्या नया नगरमधील हैदर चौक येथे तोडक कारवाई करत २० ते २५ दुकानांचे अनधिकृत शेड भुईसपाट केले आहेत. 

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्त्याच्या बाजूला असलेलं दुकानांचं अनधिकृत बांधकाम तोडण्यात आलं. हिंसाचाराच्या घटनेनंतर ४८ तासातनया नगर परिसरातील अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवण्यात आला.

२१ जानेवारीला शोभायात्रेवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने परिसरात १२० जवानांची तुकडी तैनात करण्यात आली. परिसरात पोलिसांनी फ्लॅगमार्चही केला. त्यानंतर मंगळवारी मीरा-भाईंदर पालिकेकडून परिसरातील अवैध बांधकामं तोडण्यात आली.

WhatsApp channel
विभाग